शेगावात प्लास्टिक निर्मूलन रॅली

By Admin | Published: August 28, 2016 11:11 PM2016-08-28T23:11:43+5:302016-08-28T23:11:43+5:30

८00 च्यावर विद्यार्थी या रॅलीत सहभागी.

Plastic Eradication Rally in Shegat | शेगावात प्लास्टिक निर्मूलन रॅली

शेगावात प्लास्टिक निर्मूलन रॅली

googlenewsNext

शेगाव(जि. बुलडाणा), दि. २८: नगरपालिका प्रशासन विविध सामाजिक संस्था आणि शालेय विद्यार्थ्यांंंंच्या सहभागातून रविवारी शेगावात प्लास्टिक निमुर्लन रॅली काढण्यात आली. ८00 च्यावर विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.
शेगावातील शेगाव नगर परिषद व शहर पोलिस स्टेशन शेगाव व्यापारी संघटना, जायंट्स ग्रुप, लॉयन्स क्लब शेगाव प्रेस क्लब, प्रेसक्लब, मंथन ग्रुप, संघर्ष ग्रुप, नागरिक हक्क संरक्षण समिती, मारवाडी महिला ग्रुप न.प. अंतर्गत सर्व मराठी- उर्दू शाळांचे ७00 च्यावर विद्यार्थी अशा जवळपास ८00 च्यावर नागरिक या भव्य रॅलीत सहभागी झाले. कॅरीबॅग बंदीचे स्लोगन या रॅलीत विद्यार्थी पत्रक घेवून घोषणा देत व पथनाट्यद्वारे प्लास्टिक कॅरीबॅग बंदी १ तारखेपासून शहरात होत असल्याचे सूचना करीत रॅली शेगाव नगर परिषदेत पोहचली. यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांंंंच्या समोर स्वामी विवेकानंद इंग्लीश कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांंंंनी पथनाट्य कॅरीबॅगचे दुष्परिणाम यावर आकर्षक सादरीकरण केले. य्विद्यार्थ्यांंंंना यावेळी न.प.च्यावतीने बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. मुख्याधिकारी अतुल पंत यांनी या रॅलीचे यशस्वीतेसाठी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी शहरातील शाळेचे शिक्षक, मान्यवर प्रमुख पाहुणे न.प.चे पदाधिकारी नगरसेवक, अध्यक्ष शारदा गोपाळ कलोरे, पत्रकार बांधव, न.प. कर्मचारी यांची उपस्थिती होती. उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थी कापडी पिशवीचे वाटप यावेळी उपस्थितांना केले.

Web Title: Plastic Eradication Rally in Shegat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.