कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व हिवरा आश्रमच्या खेळाडूच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:36 PM2018-12-24T16:36:08+5:302018-12-24T16:36:31+5:30

मेहकर: पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा सुरत येथे होत असून,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट चमूमध्ये हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा विद्यार्थी राहूल म्हस्के हा संघ प्रमुख म्हणून तर विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या इतर दोन खेळाडूंचा या संघात सहभाग आहे. 

players of the Hivra Ashram lead agri university cricket team | कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व हिवरा आश्रमच्या खेळाडूच्या हातात

कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व हिवरा आश्रमच्या खेळाडूच्या हातात

Next

मेहकर: पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा सुरत येथे होत असून,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट चमूमध्ये हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा विद्यार्थी राहूल म्हस्के हा संघ प्रमुख म्हणून तर विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या इतर दोन खेळाडूंचा या संघात सहभाग आहे. 
सुरत येथे  होणाºया  पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट सामन्यांमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात सह २१ राज्यातून संघ क्रिकेट खेळण्यासाठी सहभागी आहेत. पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट सामन्याचे आयोजन २० डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान सुरत येथे केले आहे.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट चमूमध्ये विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा विद्यार्थी राहूल म्हस्के हा संघ प्रमुख म्हणून नेतृत्त्व करत आहेत. तर विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी ज्ञानेश्वर बानोरे, गोपालसिंग राजपूत यांची संघात निवड झाली आहे.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्रिकेटच्या संघ व्यवस्थापक म्हणून विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्रा. विशाल काकड यांची निवड झाली आहे. राहूल म्हस्के या विद्यार्थ्याने या अगोदर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन धावण्याच्या स्पर्धेत २००, ४०० व ८०० मीटर सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते, विश्वस्त नारायण भारस्कर, पुरूषोत्तम आकोटकर, प्राचार्य डॉ. सुभाष कालवे, अनुप शेवाळे यांनी कौतू केले. (वार्ताहर)

Web Title: players of the Hivra Ashram lead agri university cricket team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.