महिलांच्या कर्तृत्वाची योग्य दखल घ्या

By admin | Published: March 9, 2015 02:09 AM2015-03-09T02:09:31+5:302015-03-09T02:09:31+5:30

लोकमत परिचर्चेतून महिलांनी मांडले नवे सूत्र.

Please take proper care of women's duties | महिलांच्या कर्तृत्वाची योग्य दखल घ्या

महिलांच्या कर्तृत्वाची योग्य दखल घ्या

Next

बुलडाणा : महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करीत असताना वर्किंंग वूमन व हाउस वाइफ असा भेद करण्याची गरज नाही. प्रत्येकीने निवडलेले काम हे ती त्याच ध्येयाने, ध्यासाने व जिद्द तसेच आ त्मविश्‍वासाच्या बळावर करीत असते. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाची चर्चा करताना त्यांच्या कर्तृ त्वाची व कामाची योग्य दखल घेण्याची तसेच त्यांना सन्मान देण्याची गरज असल्याचा सूर ह्यलोकमतह्ण परिचर्चेतून समोर आला आहे. लोकमत जिल्हा कार्यालयात आयोजित या परिचर्चेत महिलांनी आपली मते परखडपणे मांडली. शिल्पा बुरड यांनी चर्चेची सुरुवात करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक घरातून महिलांच्या सन्मानाचा संस्कार व्हावा, अशी भूमिका पद्मा परदेशी यांनी मांडून प्रत्येक घरातून महिलांचा सन्मान झाला पाहिजे, असा आग्रह धरला. या दृष्टिकोनातूनच संगीता राजोरिया यांनी गृहिणीच्या कामाचे योग्य मूल्यमापन झाले पाहिजे व तिच्या कामाचाही सन्मान झाला पाहिजे, असे मत व्यक्त करून ही चर्चा पुढे नेली. सबलीकरणाची प्रक्रिया सुरू करताना आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी स्वातंत्र्याचा योग्य वापर करा, असा सल्ला डॉ. मनीषा राठी यांनी दिला. डॉ. सुप्रिया वाघमारे यांनी मुलांवर घर आणि शाळांमध्ये होणार्‍या संस्कारांवर भर देत पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे, अशी गरज व्यक्त केली. महिलांना निर्णयस्वातंत्र्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली. महिलांनीच महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत सर्वांंंनीच मांडले. महिला दिनानिमित्त प्रत्येक घरात महिलांच्या सन्मानाची सुरुवात व्हावी म्हणजे समाजात आपोआप होईल, असा सूर तब्बल एक तास रंगलेल्या या चर्चेतून समोर आला. चर्चेत महिलांनी आपली मते अधिक परखडपणे मांडली.

Web Title: Please take proper care of women's duties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.