धामणगाव बढे-वाघजाळ फाटा रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:27 AM2021-04-29T04:27:00+5:302021-04-29T04:27:00+5:30
वाघजाळ फाटा ते धामणगाव बढे १९ किलोमीटरचे अंतर असून, मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत किमान तीन वेळा या ...
वाघजाळ फाटा ते धामणगाव बढे १९ किलोमीटरचे अंतर असून, मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत किमान तीन वेळा या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. प्रत्येक वेळी अर्धे खड्डे तसेच सोडून अर्ध्या खड्ड्यामध्ये बारीक गिट्टी भरण्यात येते. आठ दिवसांनी तीच रेती रस्त्यावर येते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली असून, वारंवार होणारी डागडुजी फक्त अर्थपूर्ण वाटाघाटीसाठी होत असते. संबंधित ठेकेदार डागडुजीचे काम करीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे लक्ष नसते किंवा जाणून बुजून त्याकडे कानाडोळा केला जातो. मागील एका वर्षात किमान तीन वेळा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली, पण एकदाही या रस्त्याची दुर्दशा बदलली नाही.
दुचाकी वाहन चालकाचे तर या रस्त्यावर नियमित अपघात होत असतात. मार्च महिन्यात या रस्त्याची मागील एका वर्षात तिसऱ्यांदा दुरुस्ती झाली. यावेळीसुद्धा अर्धे खड्डे, तसेच सोडून देण्यात आले़ सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वेळा काम न करताच बिल काढावे; परंतु तिसऱ्यांदा प्रामाणिकपणे रस्त्याचे काम करावे, अशी मागणी रस्त्यातील खड्ड्यांना व सततच्या दुरुस्तीला कंटाळलेले वाहन चालक करीत आहे