खामगावातील कचराकुंड्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 04:23 PM2020-02-03T16:23:02+5:302020-02-03T16:23:06+5:30

महिनाभरापूर्वी शहरात बसविण्यात आलेल्या ७० कचराकुंड्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे.

The plight of the dustbin in Khamgaon | खामगावातील कचराकुंड्यांची दुर्दशा

खामगावातील कचराकुंड्यांची दुर्दशा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’अंतर्गत शहरातील बाजारपेठेत आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या ७० जुळ्या कचराकुंड्यापैकी अनेक कचराकुंडीची दुर्दशा झाली आहे. लावल्यानंतर अवघ्या महिनाभरातच या कचराकुंड्या कोलांडल्या आहेत. याकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे  दुर्लक्ष आहे.
स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने आदेश दिले आहेत. त्यानुसार कचºयाची विल्हेवाट  योग्य पध्दतीने लावावी लागणार आहे. मात्र, शहरातील कचरा संकलन आणि कचरा व्यवस्थापनाकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अगदी महिनाभरापूर्वी शहरात बसविण्यात आलेल्या ७० कचराकुंड्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणच्या कचराकुंडी गायब झाल्या आहेत. तर काही ठिकाणच्या कचराकुंडी व्यावसायिकांनी आपल्या दुकानाजवळ कचरा संकलन केंद्र नको म्हणून उखडून फेकल्या आहेत. तर काही ठिकाणच्या कचराकुंडी बसविल्यानंतर काही दिवसातंच कोलांडल्या आहेत. मात्र, याकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते.

 
आरोग्य विभागाकडून चुकीचा अहवाल!

शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या कचराकुंडी बाबत तसेच कचरा संकलन आणि कचरा उचलण्याबाबत आरोग्य विभागातील आरोग्य निरिक्षकांकडून चुकीचा अहवाल वरिष्ठांना सादर केल्या जातो. त्यामुळे गत काही दिवसांपासून आरोग्य विभागातंर्गत कचरासंकलन आणि इतर बाबतीत सर्वकाही आॅलबेल सुरू असल्याचे दिसून येते.


 
विविध चौकात कचरा समस्या गंभीर!
शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांसोबतच इतरही ठिकाणी कचºयाची समस्या आहे. या कचºयाची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने ही समस्या गंभीर बनली आहे.  रस्त्यात कचरा पडलेला दिसतो. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला जात नाही. कचरा रस्त्याच्या कडेला कुठेही टाकून दिला जातो. यामध्ये प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात असतो. या कचºयामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. 

Web Title: The plight of the dustbin in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.