प्लॉट खरेदी- विक्री घोटाळा :तलाठी चोपडेच्या मर्जीतील दलालांचा अनेकांना ठेंगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 03:47 PM2019-12-27T15:47:47+5:302019-12-27T15:47:52+5:30
दलालांनी आपले नातेवाईक, शेजारी आणि जवळच्या मित्रांनाच ‘ठेंगा’दाखविल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मुळ मालक बदलवून प्लॉट खरेदी-विक्रीतून अनेकांना कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या चोपडेकडे दलांलांची मोठी फौज तैणात होती. यापैकी काही दलाल चोपडेचे खास होते. त्यांच्यावर चोपडे मोठी उधळपट्टी करीत. त्यामुळे महसूल विभागात बनावट कागदपत्रे तयार केल्यानंतर लागलीच त्याला ग्राहक मिळत. त्वरीत ग्राहक मिळविण्यासाठी काही दलालांनी आपले नातेवाईक, शेजारी आणि जवळच्या मित्रांनाच ‘ठेंगा’दाखविल्याचे दिसून येते.
खामगाव भाग-१ चा तलाठी चोपडे याने त्याच्या कार्यकाळात मुळ हस्तलिखीत ७/१२ मध्ये बनावट नोंदी केल्या. या बनावट नोंदी करून त्या आधारे संगणकीकृत ७/१२ तयार केलेत. त्यानंतर शहरातील विविध मोक्या ठिकाणावरील आणि गृहनिर्माण सोसायटीमधील प्लॉटच्या खरेदी आणि विक्रीचे व्यवहार केले. दरम्यान फेरफार रद्द करण्यात आल्यानंतरही तलाठी चोपडे याने आपल्या लगटच्या अनेकांना प्लॉटचे मालक बनविले असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तहसीलदारांनी नेमलेल्या ९ सदस्यीय चौकशी समितीने खामगाव साज्यातील संपूर्ण ९ हजारापेक्षा जास्त ७/१२ उताºयांची चौकशी सुरू केली आहे. बुधवारी सुटीच्या दिवशीही या समितीतील काही सदस्यांनी पथकप्रमुख तथा नायब तहसीलदार विजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत रेकॉर्डरूम मधील दस्तऐवजांची तपासणी केली. खात्रीलायक माहितीनुसार चौकशी समितीला ९३ जणांच्या बनावट नोंदी आढळून आल्याचे समजते. चोपडेंच्या खासमर्जीतील दलांलामुळे अनेकांच्या जीवाला ‘घोर’पडला असून एका दलानाने फसवणुकीच्या माध्यमातून नातेवाईक, मित्रांना चांगलाच ‘ठेंगा’दाखविल्याची चर्चा आहे.