खामगावात दीडशे कोटींचा प्लॉट  खरेदी-विक्री घोटाळा : तलाठ्याने जमा केली कोट्यवधीची माया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:50 PM2019-12-23T13:50:45+5:302019-12-23T13:50:57+5:30

या घोटाळ्यातून तलाठी चोपडे आणि महसूल मधील काही अधिकाºयांनी कोट्यवधींची माया जमविल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.

Plot worth Rs 150 crore in Khamgaon scam: Talathi deposits billions of ruppes | खामगावात दीडशे कोटींचा प्लॉट  खरेदी-विक्री घोटाळा : तलाठ्याने जमा केली कोट्यवधीची माया!

खामगावात दीडशे कोटींचा प्लॉट  खरेदी-विक्री घोटाळा : तलाठ्याने जमा केली कोट्यवधीची माया!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरात उघडकीस आलेला प्लॉट खरेदी-विक्रीचा घोळ हा दीडशे कोटींच्यावर जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. अनेकांची फसवणूक झाल्याने तलाठी चोपडेंसोबतच महसुल मधील काही अधिकारी यामध्ये गुंतल्याचे चित्र आहे. या घोटाळ्यातून तलाठी चोपडे आणि महसूल मधील काही अधिकाºयांनी कोट्यवधींची माया जमविल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.

खामगाव भाग- १ चा तलाठी राजेश चोपडे हा स्थानिक आणि बºयाच वर्षांपासून एकाच महसूल मंडळात असल्याने सुरूवातीला त्याने शहर आणि शहरालगतच्या विविध मालमत्ता आणि त्या मालमत्ता धारकांचा मुळ मालकांचा शोध घेतला. त्यानंतर मयत झालेल्या तसेच बाहेरगावी असलेल्या  मालमत्तांचे मुळ मालक बदलवून त्यांचे प्लॉट परस्पर विकून लक्षावधींची माया जमविली. शहरातील दोन फसवणूक प्रकरणात भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल असलेल्या आणि सद्यस्थितीत २२ दिवसांपासून फरारी असलेला तलाठी राजेश चोपडे याने शहरातील सुमारे ५४ पेक्षा जास्त प्लॉट धारकांची नोंद घेताना  खाडाखोड करून घोळ करण्यात आल्याचे उघडकीस आले. तलाठ्याचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर काही सामाजिक कार्यकत्यांच्या निवेदनावरून महसूल प्रशासन खळबळून जागे झाले. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ९ सदस्यीस समिती नेमण्यात आली. यामध्ये अनेकांची मोठ्याप्रमाणात फसवणूक झाल्याचे दिसून येते.


 
मंडळ अधिकाºयांची भूमिकाही संशयास्पद!

तलाठ्याने प्लॉटची नोंद घेतल्यानंतर सदर प्लॉट महसूल दरबारी ‘रूजू’करणे  ही जबाबदारी मंडळअधिकाºयांची आहे. त्यामुळे तलाठी चोपडे याला मंडळ अधिकाºयाचे अभय असल्याचे दिसून येते. तहसीलदारांनी गतवर्षी   संगणकीकृत ७/१२ अपडेट करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी शहरातील सर्वच मालमत्ता अपडेट असल्याचा अहवाल मंडळ अधिकाºयांनी महसूल स्तरावर सादर केला. त्यामुळे शहरातील मुळ मालक बदलवून करण्यात आलेल्या प्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्यात  मंडळ अधिकाºयाची महत्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट होते.

 
फसवणूक झालेल्यांनी संपर्काचे आवाहन!
तलाठी चोपडे याने एकापेक्षा अनेकांना गंडा घातला आहे. आपल्याही काही मालमत्ता चोपडे परस्पर विकल्या आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह, महिला, शिक्षक, पोलिस आणि  न्यायालयीन कर्मचाºयांचाही समावेश आहे. मात्र, चोपडे हा बडा प्रस्थ असल्याने महसूल आणि पोलिसांकडून जनतेला न्याय मिळण्याची अपेक्षा घुसर झाली आहे. म्हणूनच प्लॉट खरेदी-विक्रीत फसवणूक झालेल्यांना न्याय देण्यासाठी आपण एक आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. फसवणूक झालेल्या संपर्क करावा, असे आवाहनही राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी केले आहे.
 
तलाठी राजेश चोपडे याने शहरातील प्लॉट विक्रीत घोळ केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.  सद्यस्थितीत ५४ प्लॉटचे मूळ मालक बदलवून त्याने संगनमताने घोळ केला असून दोन प्रकरणांमध्ये त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. म्हणूनच त्याला निलंबित केले आहे. या घोटाळ्याची ९ सदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरू आहे. यामध्ये ४ तलाठी, ४ मंडळ अधिकारी आणि एका नायब तहसिलदारांचा समावेश आहे.
- डॉ. शीतलकुमार रसाळ
प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार, खामगाव.

 
तलाठी चोपडे याने शंभरापेक्षा जणांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. त्याने अनेकांना गंडा घातला असून त्याला महसूल मधील काही वरिष्ठांची साथ असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मंडळ अधिकाºयांची भूमिका यामध्ये संशयास्पद आहे. चोपडेने अपसंपदेने मिळविलेली संपत्ती जप्त करून त्याच्या नातेवाईकांची चौकशी केली जावी.
- देवेंद्र देशमुख
राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक, खामगाव.

Web Title: Plot worth Rs 150 crore in Khamgaon scam: Talathi deposits billions of ruppes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.