शेतातील नांगरणीवरून वाद; पिता-पुत्र गंभीर
By Admin | Published: May 14, 2017 04:01 AM2017-05-14T04:01:57+5:302017-05-14T04:01:57+5:30
शेत नांगरण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली असून, यामध्ये पिता- पुत्र जखमी झाले.
सिंदखेड राजा: चिंचोली बु. येथे १३ मे रोजी सकाळी ७ वाजता शेत नांगरण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली असून, यामध्ये पिता- पुत्र जखमी झाले.
१३ मे रोजी चिंचोली बु. येथील शेत शिवारात सकाळी ७ वाजता संजय दगडू गायकवाड व त्यांचा मुलगा स्वप्निल हे नांगरणी करीत असताना दत्तू गायकवाडसह १0 आरोपींनी त्यांना लाथा-बुक्क्या व विळ्याने मारहाण केली. यामध्ये संजय गायकवाड व स्वप्निल गायकवाड दोघेही जखमी झाले.
संजय दगडू गायकवाड यांच्या तक्रारीनुसार आरोपी दत्तू धोंडीबा गायकवाडसह दहा व्यक्तीवर कलम १४३, ४७, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५0४, ५0७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक ठाणेदार संतोष नेमणार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजू खारडे पुढील तपास करीत आहेत. आरोपीवर गुन्हे दाखल झाले असून, जखमी असलेल्या दोघांना जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले.