PM Kissan Scheme : ६ हजार शेतकऱ्यांना परत करावे लागणार ५ काेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 11:56 AM2020-10-28T11:56:25+5:302020-10-28T11:56:34+5:30
PM Kissan Scheme: बुलडाणा जिल्ह्यात ५ कोटी ३३ लाख १६ हजार रुपयांचा निधी परत घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत अपात्र ठरलेल्या तथा आयकर भरणाऱ्या ५,९८६ शेतकऱ्यांकडून बुलडाणा जिल्ह्यात ५ कोटी ३३ लाख १६ हजार रुपयांचा निधी परत घेण्यात येणार आहे.
यासंदर्भात केंद्र शासनाकडून जिल्हा प्रशासनास सुचना प्राप्त झाल्यानंतर आता आपत्ती व्यस्थापन विभागाकडून अनुषंगीक हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान आयकर विभागाकडूनही त्यासंदर्भाने तहसिलस्तरावर प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावर माहिती उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
प्रारंभी अल्प व अत्यल्प भुधारकांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली हाेती. त्यात सरसकट सर्वच शेतकऱ्यांना वषाकाठी सहा हजार रूपये देण्यात येत आहेत. मात्र काही आयकर भरणाऱ्यांचाही यात समावेश झाल्याने अनुषंगीक विषयान्वये आता कार्यवाही करण्यात येत आहे.
तहसिलस्तरावरून ही कार्यवाही सुरू करण्यात आली असून आयकर विभागाकडूनही अनुषंगीक माहिती उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच आतपर्यंत एकूण लाभ मिळालेल्यांचा आकडाही निश्चित नसल्याचे सांगण्यात आले.