आचारसंहिता कालावधीत पोलिसांची कारवाई

By admin | Published: October 5, 2014 12:43 AM2014-10-05T00:43:06+5:302014-10-05T01:02:18+5:30

११0 जणांविरुद्ध कारवाई; १ लाख ४२ हजार ४१0 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Police action during the Code of Conduct | आचारसंहिता कालावधीत पोलिसांची कारवाई

आचारसंहिता कालावधीत पोलिसांची कारवाई

Next

जळगाव जामोद : आदर्श आचारसंहिता व दुर्गा उत्सव काळात पोलिसांनी धडक मोहीम राबवून केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत ११0 जणांविरुद्ध कारवाई केली व १ लाख ४२ हजार ४१0 रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१ ते ३0 सप्टेंबरदरम्यान जळगाव जा. तालुका हद्दीत कारवाई करण्यात आली. यामध्ये जुगार पकडून ४ केसेसमध्ये २0 आरोपींवर कारवाई करून १0,७९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दारुबंदीमध्ये १३ केसेस करून १३ आरोपींविरुद्ध कारवाई झाली. यामध्ये १ लाख ३१ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कलम १0७/११६ (३) मध्ये ४९ इसमांविरुद्ध कारवाई केली. कलम ९३ मुपोका अंतर्गत ६ इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर कलम ५७ मुपोका हद्दपारीमध्ये १ इसमाविरुद्ध कारवाई केली. तसेच मध्यप्रदेश अथवा परप्रांतातून होणारी तस्करी अथवा पैशाची अवैध रितीने वाहतूक होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे ठाणेदार यांनी निवडणुकीदरम्यान मध्यप्रदेशात जाणार्‍या बर्‍हाणपूर रस्त्यावर निमखेडी येथे चेक पोस्ट उभारले आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेदरम्यान याच रस्त्यावरून येणारा २५ लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला होता. वरील कारवाईसाठी नेमलेल्या पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक संदीप मुपडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धामोळे, बघे, पोकॉ भारसाकळे आणि गवळी यांनी विशेष कामगिरी बजावली आहे.

Web Title: Police action during the Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.