उघड्यावर शौचास बसल्यास पोलीस कारवाई!

By admin | Published: March 10, 2016 02:03 AM2016-03-10T02:03:34+5:302016-03-10T02:03:34+5:30

संग्रामपूर तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम करमोडा ग्रा.पं.ने घेतला ठराव

Police action on the opening of the open! | उघड्यावर शौचास बसल्यास पोलीस कारवाई!

उघड्यावर शौचास बसल्यास पोलीस कारवाई!

Next

संग्रामपूर (बुलडाणा): तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम करमोडा हे गाव १00 टक्के हगणदरीमुक्त करण्याचा निर्धार येथील महिला सरपंच स्नेहा राजेश वर्गे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील काही प्रतिष्ठितांनी केला आहे. या अंतर्गत गावातील कोणीही उघड्यावर शौचास बसला असल्याचे आढळून आल्यास त्याला १00 रुपये दंड करण्याचा ठराव ग्रामपंचायतच्या सभेत घेतला आहे. सासंद आदर्श गाव करमोडा येथे एकूण ५७४ कुटुंब असून, ५१३ शौचालय बांधकामाचे या गावाकरिता उद्दिष्ट होते. यापैकी ४८0 लाभार्थींनी शौचालय बांधकाम केले असून, उर्वरित ३३ शौचालय बांधकामाचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ३९५ कुटुंबांनी शौचालयाचे सन २0१५-१६ मध्ये बांधकाम केले आहेत. तर निर्मल भारत योजने अंतर्गत ८६ कुटुंबांनी शौचालयांचे बांधकाम केले आहे. त्यामुळे या गावाची वाटचाल आता १00 टक्के हगणदरीमुक्त गावाकडे होत आहे.
येथील महिला सरपंच स्नेहा राजेश वर्गे यांनी पुढाकार घेऊन ग्रा.पं. सदस्या महिलांचा व गावातील काही महिलांना सोबत घेऊन महिलांचा व पुरूषांचा गट तयार करून दररोज पहाटे गावातील घरोघरी जाऊन गाव स्वच्छतेविषयी महत्त्व पटवून देण्यात येत आहे. तसेच उघड्यावर शौचास बसल्यास त्यापासून होणार्‍या रोगराईसंदर्भात महिला व पुरूष गटाकडून जनजागृती करण्यात येत आहे. गत १0 ते १५ दिवसांपासून गाव परिसरात महिला व पुरूषांचे दोन गटांकडून उघड्यावर शौचास जाणार्‍यांना समज देण्यात येत आहे. यामुळे मोहिमेमुळे कोणीही उघड्यावर शौचास जात नसून, यामुळे सांसद आदर्श ग्राम करमोडा हे आता १00 टक्के हगणदरीमुक्त झाले आहे. त्यामुळे गावातील स्वच्छतेत आता भर पडली असून, येथील महिला सरपंचा यांचे गावातील नागरिक कौतुक करीत आहेत.

Web Title: Police action on the opening of the open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.