पोलिसांची वकिलास अपमानास्पद वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:42 PM2017-08-22T23:42:10+5:302017-08-22T23:42:29+5:30
बुलडाणा : येथील जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करणार्या अँड. प्रकाश गायकवाड यांना अपमानास्पद वागणूक देणार्या पोलीस कर्मचार्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. विजय सावळे, सचिव अँड. सै.हरूण यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शहर पोलीस ठाण्यात १५ ऑगस्ट रोजी अँड. प्रकाश गायकवाड हे आपल्या पक्षकारासोबत तक्रार देण्यासाठी गेले होते; परंतु पोलीस कर्मचारी प्रभाकर लोखंडे, शेख सईद यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. एवढेच नव्हे, तर त्यांची कॉलर पकडून त्यांच्याकडील मोबाइल हिसकावून घेत शिवीगाळ केली. त्याच दिवशी अँड. गायकवाड यांनी पोलिस अधीक्षकाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसर्या दिवशी वकील संघाच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील वकील कामकाजापासून अलिप्त राहिले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. यावेळी जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.