नकली सोने आणि एटीएम कार्डाची हेराफेरी करणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

By अनिल गवई | Published: November 27, 2024 06:10 PM2024-11-27T18:10:12+5:302024-11-27T18:10:43+5:30

खामगाव शहर पोलीसांची धडक कारवाई: चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त

police arrested two thieves in fake gold and atm card fraud | नकली सोने आणि एटीएम कार्डाची हेराफेरी करणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

नकली सोने आणि एटीएम कार्डाची हेराफेरी करणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: बनावट सोन्याची विक्री आणि एटीएम कार्डाची हेराफेरी करणार्या दोन चोरट्यांना शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री जेरबंद केले. या धडक कारवाईत चोरट्यांकडून नकली सोने, एटीएम कार्ड, वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

तक्रारीनुसार, शहर पोलीस स्टेशनचे सहा. पोलिस निरिक्षक भागवत मुळीक, पोहेकॉ. गजानन बोरसे, पो.ना. सागर भगत, पो.कॉ. रविंद्र कन्नर, गणेश कोल्हे, राहुल थारकर, अमरदीपसिंह ठाकूर, अंकुश गुरूदेव शहर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरिक्षक रामकृष्ण पवार यांच्या आदेशाने दुचाकीने पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, नांदुरा रोडवरील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोरील एटीएम समोर एमएच २० एमपी ७९५५ या दुचाकीवर दोन इसम संशयितरित्या आढळून आले. त्यांची कसून चौकशी केली असता, पप्पुराम अर्जुनलाल जाट (३२) वर्ष रा. केमुणीया ता. रायपुर जि. भिलवाडा, राजु बालु जाट  (४१)रा. बिडकाखेडा ता.भिलवाडा जि.भिलवाडा राज्य - राजस्थान अशी दोघांची नावे समोर आली. दोघेही अट्टल चोरटे असल्याचे समोर आले. त्यांच्या विरोधात राजस्थान आणि गुजरात राज्यात विविध गुन्हे दाखल असल्याचेही उघडकीस आले. 

त्यामुळे दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळून रोख  ९० हजार रूपये, दोन लाख ५७ हजार ५२५ रूपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, २७ हजार १४४ रुपयांच्या सोन्याच्या बाळ्या, ५५ हजार १०२ रूपये किंमतीचा सोन्याची चेन तसेच सोना सारख्या दिसणारी नकली नाणी, चांदीचे ११ हजार ५८७ रूपये किंमतीचे तीन पायल, ४ हजार ४३९ रूपये किंमतीचे चांदीचे कडे, दोन हजार २९० रूपये किंमतीचे डब्या आणि इतर साहित्य असे सोन्या चांदीचे तीन लाख ३९ हजार ७७१ रूपये किंमतीचे दागीणे जप्त करण्यात आले. याशिवाय सहा नगर एटीएम, इतर नावाचे आधार कार्ड, एक ५० हजार रूपये किंमतीची दुचाकी, दोन मोबाईल असा एकुण पाच लाख ०२ हजार ५६८ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे सर, अपर पोलीस अधिक्षक  अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी  विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Web Title: police arrested two thieves in fake gold and atm card fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.