अल्पवयीन प्रेमी युगुलांना पोलिसांनी पकडले!

By admin | Published: May 14, 2017 03:59 AM2017-05-14T03:59:27+5:302017-05-14T03:59:27+5:30

अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलीस पथकाने मुंबई येथून ताब्यात घेत शनिवारी शहर पो.स्टे.ला आणले.

Police arrested young people! | अल्पवयीन प्रेमी युगुलांना पोलिसांनी पकडले!

अल्पवयीन प्रेमी युगुलांना पोलिसांनी पकडले!

Next

मलकापूर : गत दोन दिवसांपूर्वी घरून निघून गेलेल्या अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलीस पथकाने मुंबई येथून ताब्यात घेत शनिवारी शहर पो.स्टे.ला आणले.
शहरातील महाविद्यालयात इयत्ता १२ वीत एकाच वर्गात शिकत असलेला सतरा वर्षीय तरुण तसेच त्याची १७ वर्षीय प्रेयसी हे दोघेही मलकापुरातीलच रहिवासी असून, दोन दिवसांपूर्वी हे दोघे घरून पळून गेले होते. या संदर्भात मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम ३६३, ३६६ अ, नुसार बेपत्ताची फिर्याद दाखल केली होती. दाखल झालेल्या फिर्यादीनंतर पोलीस प्रशासनाच्यावतीने या दोघांचा शोध घेण्यात आला. दरम्यान, मोबाइलचे लोकेशन शोधून काढण्यात पोउपनि सुधाकर गवारगुरू यांना यश मिळाले. यानंतर हेकॉ गजानन पाटील, योगेश जगताप, महिला पोलीस कर्मचारी शारदा जाधव या पथकाने मालाड परिसरातून या प्रेमियुगुलाला ताब्यात घेतले.

Web Title: Police arrested young people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.