दहाव्या मिनीटाला मिळणार पोलिस मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:35 AM2021-05-23T04:35:02+5:302021-05-23T04:35:02+5:30

--सोमवार पासून प्रशिक्षण-- येत्या सोमवार पासून बुलडाणा जिल्ह्यातील निवडक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महिंद्रा कंपनीचे अधिकारी प्रशिक्षण घेणार आहेत. ...

Police assistance will be available at 10 minutes | दहाव्या मिनीटाला मिळणार पोलिस मदत

दहाव्या मिनीटाला मिळणार पोलिस मदत

Next

--सोमवार पासून प्रशिक्षण--

येत्या सोमवार पासून बुलडाणा जिल्ह्यातील निवडक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महिंद्रा कंपनीचे अधिकारी प्रशिक्षण घेणार आहेत. जवळपास ५० कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मात्र त्याची रुपरेषा अद्याप स्पष्ट झालेली नाही, असे होमडिवायएसपी गिरीश ताठोड यांनी सांगितले.

--कॉल येताच कळणार लोकेशन--

या योजनेतंर्गत ठाणे येथे मुख्य नियंत्रण कक्ष राहणार असून पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षातही यासाठी एक वेगळा नियंत्रण कक्ष राहणार आहे. या ठिकाणी आपत्तीमध्ये सापडलेला व्यक्ती किंवा पीडित व्यक्ती यांनी ११२ क्रमांकावर फोन केल्यास त्याचे लोकेशन आणि त्याला मदत करण्यासाठी पोलिसांचे कोणते वाहन त्याच्या निकट आहे त्या वाहनाचे जीपीएस कळले. सोबतच वेळेत संबंधिताला मदत पोहोचविता येईल.

--जिल्ह्यात ५ वाहने उपलब्ध--

डायल ११२ योजनेतंर्गत जिल्ह्यात सध्या ५ वाहने उपलब्ध झाली आहेत. यासोबतच एप्रिल महिन्यात बुलडाणा पोलिस दलासाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत ३५ वाहने घेण्यात आली आहेत. १ कोटी २५ लाख २५ हजार रुपये किंमतीची ही वाहने घेण्यात आलेली आहे. यामध्ये १६ चारचाकी व १९ दुचाकींचा समावेश आहे. मात्र ही वाहने प्रत्यक्ष डायल ११२ योजनेसाठी वापरली जातील की नाही? याबाबत अस्पष्टता आहे.

Web Title: Police assistance will be available at 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.