भरपावसात अवैध वाहनांविरोधात पोलिसांची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:58 AM2017-10-12T00:58:37+5:302017-10-12T00:59:12+5:30
धामणगाव बढे : धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत ११ ऑक्टोबर रोजी अवैध वाहतूक करणार्या वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे : धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत ११ ऑक्टोबर रोजी अवैध वाहतूक करणार्या वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.
धामणगाव बढे ते मोताळा रोडवर सकाळी ११ वाजेपासून विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली. भरपावसात ठाणेदार दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचार्यांनी या परिसरात अवैध वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई केली. संततधार पाऊस सुरू असताना पोलिसांनी आपली मोहीम सुरूच ठेवली. अवैध वाहतूक करणार्या एकूण ३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातून शासनाला ७२00 रु.ची वसुली दंड करण्यात आला. या कारवाईमध्ये वाहनधारकांना वाहतुकीचे नियम सांगण्यात येऊन जास्त प्रवासी असलेल्या वाहनधारकांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम बुधवारी संध्याकाळी ६.३0 वाजेपर्यंत चालू होती. या मोहिमेत ठाणेदार दीपक वळवी, विनोद वाघ, सादीक शेख, आराख मॅडम, सरदार, चव्हाण पोलीस जमादार, सावळे यांनी सहभाग घेऊन मोहीम यशस्वी केली.