तलाठय़ास २१ पर्यंंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2016 02:28 AM2016-03-17T02:28:53+5:302016-03-17T02:28:53+5:30

मोताळा तालुक्यातील ४२ लाखाचे शासकीय अनुदान घोटाळा प्रकरण.

Police closet to police custody 21 | तलाठय़ास २१ पर्यंंत पोलीस कोठडी

तलाठय़ास २१ पर्यंंत पोलीस कोठडी

Next

मोताळा (जि. बुलडाणा): बोगस लाभार्थ्यांंंना शासकीय अनुदान वाटप करून ४२ लाख ३६ हजार रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी अटक केलेल्या एन. टी. उज्जैनकर या तलाठय़ास बुधवार १६ मार्च रोजी न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला २१ मार्चपर्यंंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तलाठी एन. टी. उज्जैनकर याने सन २0११-१२ व २0१२-१३ मधील खरीप अनुदान, सन २0१४ मधील गारपीटग्रस्तांचे अनुदान आणि सन २0१४-१५ मधील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार्‍या शासकीय अनुदान वाटपात भ्रष्टाचार करून ४२ लाख ३६ हजार रुपयांचा घोटाळा केल्याची बाब चौकशी समितीने उघड केली होती. या प्रकरणात तलाठी उज्जैनकर यांच्याविरोधात शासकीय अनुदानाचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी १६ मे २0१५ रोजी तत्कालीन तहसीलदार रमेश पवार यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये कलम ४२0, ४६८, ४७१, ४0९, १६६, १६७, १२0 ब, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, फरार असलेल्या तलाठी उज्जैनकर याने २0 मे २0१५ रोजी सेशन कोर्टातून अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतली होती. उज्जैनकर याला अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर सरकारतर्फे बोराखेडी पोलिसांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेत जामीन रद्द व्हावा, यासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाने सेशन कोर्टाला पुनर्विचार करण्याचे सुचविले होते. या संबंधी मलकापूर येथील सेशन कोर्टामध्ये १५ मार्च २0१६ रोजी उज्जैनकर याची अटकपूर्व जामीन रद्द करण्याची ऑर्डर निघाली. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी उज्जैनकर यास तत्काळ अटक केली आहे. बुधवारी पोलिसांनी उज्जैनकर याला कोर्टात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घोटाळा प्रकरणात तलाठी उज्जैनकरसह सात जण निलंबित झाले असून, त्यात तहसीलदार रमेश पवार यांचा समावेश आहे. शासकीय अनुदान घोटाळा प्रकरणात आरोपी उज्जैनकर प्रथमच सहा दिवस पोलीस चौकशीला सामोरे जाणार आहे.

Web Title: Police closet to police custody 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.