बाळ खरेदी करणार्‍या दोन महिलांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:11 AM2017-10-04T01:11:08+5:302017-10-04T02:09:09+5:30

खामगाव: घटस्फोटाचा बचाव करण्यासाठी बाळ खरेदी  करणार्‍या दिल्ली येथील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली  आहे. दरम्यान, या दोन्ही महिलांना मंगळवारी न्यायालयात हजर  केले असता, न्यायालयाने ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी  सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता ७ वर  पोहोचली आहे.

Police custody of two women who bought baby | बाळ खरेदी करणार्‍या दोन महिलांना पोलीस कोठडी

बाळ खरेदी करणार्‍या दोन महिलांना पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देउपजिल्हा सामान्य रुग्णालयातून केले होते पाच दिवसाच्या  बाळाचे अपहरणया प्रकरणातील आरोपींची संख्या आता ७ वर पोहोचली

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: घटस्फोटाचा बचाव करण्यासाठी बाळ खरेदी  करणार्‍या दिल्ली येथील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली  आहे. दरम्यान, या दोन्ही महिलांना मंगळवारी न्यायालयात हजर  केले असता, न्यायालयाने ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी  सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता ७ वर  पोहोचली आहे.
खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातून २७ सप्टेंबर  रोजी नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमय्या परवीन  आतिक खान या महिलेच्या पाच दिवसाच्या बाळाचे अपहरण  एका बुरखाधारी महिलेने केले होते. दरम्यान, घटनेच्या ७२  तासातच पोलिसांनी सात आरोपींना अटक करीत, बाळाला  दिल्ली येथून सुखरूप आई-वडिलांच्या हवाली केले आहे.  दरम्यान, याप्रकरणी दिल्ली येथून अटक करण्यात आलेल्या  मल्लीका बेगम हिंमत खान आणि फिरदोस आसमानी यांना  मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ६  आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात  पोलिसांनी मोहसीन खान हुसेन खान, प्रीती पिल्ले, रेबीका पिल्ले,  राजे जहागीर खान, इरफान खान बशीर खान यांना यापूर्वीच  अटक केली असून, सर्व आरोपींना ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस  कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास शहर  पोलीस स्टेशनचे ठाणेदार यू.के.जाधव यांच्या मार्गदर्शनात  खामगाव पोलीस करीत आहेत.

Web Title: Police custody of two women who bought baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.