बंदोबस्तासाठी पोलिसांची दुहेरी कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 02:01 PM2019-10-02T14:01:52+5:302019-10-02T14:02:01+5:30
निवडणूक आणि नवरात्रोत्सव अशी दुहेरी कसरत सध्या पोलिसांची सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. परंतू निवडणुकीबरोबरच पोलिसांवर नवरात्रोत्सवातील बंदोबस्ताचाही ताण वाढला आहे. त्यामुळे निवडणूक आणि नवरात्रोत्सव अशी दुहेरी कसरत सध्या पोलिसांची सुरू आहे.
सण, उत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये, शांतता सुव्यवस्था कायम राहावी, म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येतो. शहरासह ग्रामीण भागात शांतता राखण्यासाठी पोलीस तैनात केले जातात. रविवारपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून समोर दसरा व त्यातच निवडणुकीचीही धामधूम सुरू आहे. नवरात्री व दसऱ्याच्या काळात भाविकांची सर्वत्र गर्दी असते. शहरातील विविध चौकात व ग्रामीण भागातही आदिशक्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. विविध पुरातन मंदिरांमध्ये नवरात्रीनिमित्त घटस्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या ठिकाणी प्रत्येक दिवशी भाविकांची गर्दी वाढते. जिल्हाभर नवरात्रोत्सव आणि दसºयानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी अमरावती येथून राज्य राखीव दलाचे १०० जवान तैनात करण्यात आले आहे. खामगाव येथे त्यांचे मुख्यालय आहे. या जवानांचे प्रत्येकी एक प्लाटून मलकापूर, खामगाव व चिखली येथे कार्यरत राहणार आहे. एका प्लाटूनमध्ये ३० ते ३५ जवानांचा समावेश आहे. त्यात विधानसभा निवडणूक असल्याने पोलिसांचे दडपण वाढले आहे. निवडणूक आणि नवरात्रोत्स यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणाºया पोलिसांची दमछाक होत आहे.
(प्रतिनिधी)