पोलिसांना मिळाली घरे
By admin | Published: September 5, 2014 12:25 AM2014-09-05T00:25:56+5:302014-09-05T00:25:56+5:30
खामगाव येथे पोलिस कर्मचार्यांना ६१ सदनिकांचे ड्रॉ पध्दतीने चाबी वितरण.
खामगाव : पोलीस कर्मचार्यांना स्वत:चे घर मिळावे म्हणून येथील शहर पोलीस स्टेशनजवळ बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीमधील सदनिकांचे (फ्लॅट) आज ४ सप्टेंबर रोजी लकी ड्रॉ पध्दतीने चाव्या वाटप करण्यात आले.
खामगाव शहराच्या मध्यभागी शहर पोलीस स्टेशनच्या लागून असलेल्या जागेवर अत्याधुनिक पध्दतीचे ६१ निवासस्थानाचे बांधकाम करण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षापासून या निवासस्थानाचे बांधकाम सुरू होते. महिनाभरापूर्वी हे बांधकाम पूर्ण झाले आहे. या निवासस्थानामध्ये एक पोलीस निरीक्षक, ८ सहाय्यक निरीक्षक याबरोबर ५२ कार्यरत कर्मचार्यांचा समावेश आहे. शहर, शिवाजी नगर व ग्रामीण पोलीस स्टेशन या तिनही ठिकाणच्या कर्मचार्यांना यामध्ये स्थान मिळाले आहे. आज सकाळी सहाय्यक पोलीस अधिक्षक यशवंत साळुंके, उपविभागीय पोलीस अधिकारी जी.श्रीधर यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ पध्दतीने सदनिकाच्या चाव्याचे ड्रॉ काढून वितरण करण्यात आले. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिली प पाटील, शिवाजी नगरचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर आदी उपस्थित होते.