गुटखा पकडण्यासाठी आता पोलिसांची मदत

By Admin | Published: April 2, 2016 12:48 AM2016-04-02T00:48:21+5:302016-04-02T00:48:21+5:30

अन्न व औषध विभागासोबत करणार कारवाई; बंदी होणार अधिक प्रभावी.

Police help now to catch gutka | गुटखा पकडण्यासाठी आता पोलिसांची मदत

गुटखा पकडण्यासाठी आता पोलिसांची मदत

googlenewsNext

बुलडाणा : गुटख्याच्या विक्रीवर चाप ठेवण्यास अन्न व औषध विभागाची यंत्रणा कमी पडते. गुटखाबंदीची ही मोहिम प्रभावीपणे राबविल्या जावी यासाठी गुटखा बंदीच्या मिशनमध्ये राज्यातील पोलीसांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सध्या प्रतिबंधित अन्नपदार्थ, गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूवर राज्यात बंदी आहे. मात्र गुटख्याच्या विक्रीवर चाप ठेवण्यास अन्न व औषध विभागाची यंत्रणा कमी पडते. त्यामुळे या विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध कारवाईत आता स्थानिक पोलिसांची मदत मिळेल. पोलिसांनाही गुटखाबंदी मोहिमेत सामील करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. गृह विभागाचे उपसचिव सुरेश खाडे यांनी यासंदभार्तील आदेश निर्गमित केले असून हे आदेश बुलडाण्यात धडकले आहेत.
गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीवर अन्न व सुरक्षा व मानके अधिनियम अंतर्गत राज्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे. या प्रतिबंधित पदाथार्ची विक्री व साठवणूक करणार्‍या व्यक्तीविरुद्ध अन्न व औषध प्रशासन व गृह विभागामार्फत संयुक्त कारवाई करणे अपेक्षित आहे. अन्न व औषध विभागाच्या वतीने करण्यात येणार्‍या कारवाईत आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत संबंधित पोलीस घटकांना सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Police help now to catch gutka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.