लाच प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:22 AM2021-07-03T04:22:33+5:302021-07-03T04:22:33+5:30
बुलडाणा शहरातील इंदिरा नगरमध्ये राहणाऱ्या एका ३० वर्षीय व्यक्तीच्या भाच्याविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात ...
बुलडाणा शहरातील इंदिरा नगरमध्ये राहणाऱ्या एका ३० वर्षीय व्यक्तीच्या भाच्याविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात मदत करण्यासाठी आरोपी हेड कॉन्स्टेबल शिवाजी कुंडलिक मोरे याने पंचासमक्ष पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र नंतर तडजोडी अंती त्यात तीन हजार रुपये देण्याचे ठरले. त्या अनुषंगाने २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर तक्रारकर्त्यांकडून तीन हजार रुपये स्वीकारताना वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिवाजी कुंडलिक मोरे यास रंगेहात पकडले. या कारवाईमुळे बुलडाणा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
ही कारवाई वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. शेळके, पोलीस निरीक्षक एन. बी.बोराडे, पोलीस हवालदार नितीन टवलारकर, पोलीस नाईक अरविंद राठोड, योगेश खोटे, शेख नावे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.