कुजलेल्या अवस्थेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला!

By Admin | Published: June 1, 2017 12:15 AM2017-06-01T00:15:21+5:302017-06-01T00:44:01+5:30

मोताळा : बोराखेडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कुजलेला मृतदेह चिखली येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या निर्माणधिन घरात बुधवारी सकाळी आढळल्याने एकच खळबळ उडाली.

Police officer's body found in a rotten condition! | कुजलेल्या अवस्थेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला!

कुजलेल्या अवस्थेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कुजलेला मृतदेह चिखली येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या निर्माणधिन घरात बुधवारी सकाळी आढळल्याने एकच खळबळ उडाली.
बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत पोलीस हेड कॉन्सटेबल रमेश शिवाजी मिसाळकर (ब. न. १५५७) यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बोराखेडी येथील वार्ड क्र. ५ मधील साईनगरमधील सुषमा उईके यांच्या घरात आढळला. साईनगरमधील रहिवासी महिलांनी सकाळी ८ वाजता नळ आल्यामुळे पाणी भरण्यासाठी उठल्यानंतर बाजूलाच असलेल्या सुषमा उइके यांच्या नवीनच बांधकाम होत असलेल्या घरामधून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महिलांनी ग्रामपंचायत सदस्य असलेले सुनील आत्माराम तेलंग यांना याबाबत माहिती दिली. तेलंग यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्यामुळे तेलंग यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. पोलिसांनी चौकशी केली असता घरामध्ये पोलीस हेड कॉन्सटेबल रमेश शिवाजी मिसाळकर यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा व उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. मृत्यूचे कारण अद्यापही समजू शकले नसून, याबाबत परिसरात विविध चर्चांना ऊत आला आहे. ग्रामपंचायत सदस्य सुनील तेलंग यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी १७४ भादंवि नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार सुनील हुंड करीत आहेत.

Web Title: Police officer's body found in a rotten condition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.