लाच प्रकरणातील पोलीस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:21 AM2021-07-05T04:21:45+5:302021-07-05T04:21:45+5:30

बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी मोरे याने आरोपीला सहकार्य करण्यासाठी पाच हजार रुपयांची ...

Police personnel suspended in bribery case | लाच प्रकरणातील पोलीस कर्मचारी निलंबित

लाच प्रकरणातील पोलीस कर्मचारी निलंबित

Next

बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी मोरे याने आरोपीला सहकार्य करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी आरोपीचे इंदिरानगरमधील मामा यांनी अमरावती एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुषंगाने पडताळणी करून २ जुलै रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी मोरे यास वाशिम एसीबीच्या पथकाने रंगेहात तीन हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती.

या प्रकरणी गुन्हा दाखल करून शनिवारी त्यास बुलडाणा न्यायालयासमोर हजर केले असता २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यात काही अडचणी आल्यामुळे त्यास न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यास निलंबित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिली.

Web Title: Police personnel suspended in bribery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.