कुंटणखान्याच्या संशयावरून पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 01:28 AM2017-09-30T01:28:25+5:302017-09-30T01:29:59+5:30

देऊळगाव राजा : शहरातील मध्यवस्तीत कुंटणखाना  चालविल्या जात असल्याच्या संयशावरून पोलिसांनी २६ स प्टेंबर रोजी रात्री छापा टाकून तीन महिलांसह सहा जणांविरूध्द  कारवाई केली. दरम्यान प्रतिष्ठीत नागरिकांमार्फत होणार्‍या वारंवार  तक्रारीनंतर शनिवार पेठेतील कृष्णकुंज निवासस्थानासमोर  नागरिकांनी गर्दी केली होती. 

Police raid | कुंटणखान्याच्या संशयावरून पोलिसांचा छापा

कुंटणखान्याच्या संशयावरून पोलिसांचा छापा

Next
ठळक मुद्देवारंवार होणार्‍या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केलीशनिवार पेठेतील कृष्णकुंज निवासस्थानासमोर  नागरिकांनी गर्दी केली होती

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा : शहरातील मध्यवस्तीत कुंटणखाना  चालविल्या जात असल्याच्या संयशावरून पोलिसांनी २६ स प्टेंबर रोजी रात्री छापा टाकून तीन महिलांसह सहा जणांविरूध्द  कारवाई केली. दरम्यान प्रतिष्ठीत नागरिकांमार्फत होणार्‍या वारंवार  तक्रारीनंतर शनिवार पेठेतील कृष्णकुंज निवासस्थानासमोर  नागरिकांनी गर्दी केली होती. 
शनिवारपेठ येथील कृष्णकुंज निवासस्थानाच्या मागील दिशेने  काही संशयीत महिला व पुरूषांची रेलचेल असते. त्याठिकाणी  कुंटणखाना चालविल्या जाते, अशा प्रकारच्या तक्रारी शनिवार पेठ व तांबटकर गल्लीतील नागरिकांनी पोलिस विभागाकडे  केल्या होत्या. सदर तक्रारीवरून मागील महिन्यात पोलिसांनी  काही महिलांना ताब्यात घेवून घरमालकास तंबी दिली होती.  बुधवारी सायंकाळी सदर निवासस्थानात काही महिला व  पुरूषांना जाताना पाहिल्यानंतर प्रतिष्ठीत नागरिकांनी पोलिसात  माहिती देत कारवाईची मागणी करताच ठाणेदार सारंग नवलकर  यांनी पोलिस कर्मचारी पाठविले. पोलिसांनी सदर घरासमोर व  मागील बाजूने एकाच वेळी दार ठोठावले मात्र दार उघडण्यात  आले नाही. तासभर पोलिसांसह नागरिक घरासमोर ताटकळत  असताना घरातील लोकांनी दार उघडले नाही शेवटी पोलिसांची  सहनशिलता संपली व त्यांनी मागील दिशेने असलेले दार तोडून  घरात प्रवेश केला व तीन महिला, तीन पुरूषांना ताब्यात घेतले. 
दरम्यान प्रतिष्ठीत वस्तीतील कृष्णकुंज या निवासस्थानी  आढळणार्‍या दादाराव हिवाळे पोखरी, किशोर अर्जुनदास उदासी  रा.शनिवारपेठ, संजय गुलाब पवार रा.किन्ही पवार यांच्यासह  तीन महिलांविरूध्द कारवाई केली आहे. 

Web Title: Police raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.