जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:30+5:302021-01-02T04:28:30+5:30
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा - सिंदखेड राजा रोडवरील पिंपळनेर शिवारामध्ये जुगाराचा डाव चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे ...
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा - सिंदखेड राजा रोडवरील पिंपळनेर शिवारामध्ये जुगाराचा डाव चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा तसेच देऊळगाव राजा पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचत या जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून बारा जणांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपी विनोद गणेश मेहेत्रे, कोंडिबा रामभाऊ भोजने (रा. सिंदखेड राजा), गुलाम नबी शेख नजीर (रा. जालना), सय्यद मोसीन सय्यद कट्टू (रा. सिंदखेड राजा), दिलीप गणपत ढोबळे (रा. सावखेड भोई), सय्यद युसूफ सय्यद उस्मान (रा. देऊळगाव राजा), सिद्धांत आनंदराव खांडेभराड (रा. देऊळगाव राजा) यांच्यासह अन्य सात आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई पोलिसांनी केली आहे. यातील पाच जण मात्र फरार होण्यात यशस्वी झाले. या कारवाईमध्ये १ लाख १७ हजार पाचशे रुपये रोख, सात मोबाइलसह सहा दुचाकी असा एकूण तीन लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पाटील व श्रीकृष्ण गवई हे करीत आहेत.