१२ हजार पदांसाठी पोलीस भरतिप्रक्रिया

By admin | Published: December 19, 2014 01:11 AM2014-12-19T01:11:27+5:302014-12-19T01:11:27+5:30

१२ हजार ३६९ पदांसाठी भरतिप्रक्रिया राबविली जाणार.

Police recruitment for 12 thousand posts | १२ हजार पदांसाठी पोलीस भरतिप्रक्रिया

१२ हजार पदांसाठी पोलीस भरतिप्रक्रिया

Next

खामगाव (बुलडाणा) : राज्य पोलीस दलात येत्या पाच वर्षांत पाच टप्प्यांत दाखल करावयाच्या प्रस्तावित ६१ हजार ४९४ पदांपैकी पहिल्या टप्प्यात १२ हजार ३६९ पदांसाठी भरतिप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आस्थापनेवर नवीन ६४ पोलिस ठाणी व विविध घटकांसाठी १0 हजार ८७९ पदे आणि बृहन्मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आस्थापनेवर १ हजार ५00 पदे अशी एकूण १२ हजार ३७९ नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या पदांसाठी भरतिप्रक्रिया सुरु होणार असल्याने कमी संख्येमुळे पोलीस दलावरील ताण दूर होण्यासोबतच बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
सदर पदांच्या पदनिर्मितीसाठी आवर्ती रुपये ५0७ कोटी व अनावर्ती रुपये ५८.५३ कोटी असा एकूण रुपये ५६५.९९ कोटींचा निधी मंजूर करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार पोलीस महासंचालकांच्या आस्थापनेवर ६३ नवीन पोलीस ठाण्यांसाठी व विविध घटकांकरिता १0 हजार ४४३ पदे तसेच बृहन्मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आस्थापनेवर १ हजार ५00 अशी एकूण ११ हजार ९४३ पदे निर्माण करण्यात आली आहेत. लवकरच या टप्प्यातील भरतिप्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. या भरतिप्रक्रियेमुळे राज्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल.

Web Title: Police recruitment for 12 thousand posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.