आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च
By अनिल गवई | Published: April 5, 2023 04:50 PM2023-04-05T16:50:32+5:302023-04-05T16:50:41+5:30
या रूट मार्चमध्ये दंगा नियंत्रण पथक, एसआरपी प्लाटूनचे जवान, शहर पोलिस सहभागी झाले होते.
खामगाव : आगामी सण उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुधवारी शहरातील मुख्य मार्गांवरून रॅपिड ॲक्शन फोर्स पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.
या रूटमार्चला शहर पोलिस स्टेशनपासून सुरुवात झाली. त्यानंतर अग्रसेन चौक, महावीर चौक, केडिया टर्निंग, सरकी लाइन, निर्मल टर्निंग, मस्तान चौक, दाल फैल, फरशी, भगतसिंह चौक, एकबोटे चौक, अग्रसेन चौक असे मार्गक्रमण करीत परत शहर पोलिस स्टेशनमध्ये रूट मार्च आला व समारोप करण्यात आला. या रूट मार्चमध्ये दंगा नियंत्रण पथक, एसआरपी प्लाटूनचे जवान, शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक शांतीकुमार पाटील, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुण परदेशी, पोलिस कर्मचारी, १०२ बटालियन आर ए एफ नवी मुंबई सहायक कमांडंट श्रीमती नेहा यादव, संतोष कुमार यादव सहायक कमांडंट, निरीक्षक गुलाब सिंह, निरीक्षक रवीकांत, जवान आदी सहभागी होते.