सैलानी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 06:30 PM2019-03-15T18:30:47+5:302019-03-15T18:32:05+5:30
यात्रेत गैरप्रकार टाळण्यासाठी व यात्रेमध्ये अवैध धंदे चालकांसोबत जागा मालकांवरही कारवाई करण्याचे निर्देश अपर पोलीस अधिक्षक संदिप डोईफोडे यांनी दिले आहेत.
पिंपळगाव सराई: सैलानी बाबांच्या यात्रा उत्सवाला सुरूवात झाली असून, यात्रेदरम्यान ५० अधिकाºयांसह ६०० पोलीस कर्मचाºयांकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे. या यात्रेत गैरप्रकार टाळण्यासाठी व यात्रेमध्ये अवैध धंदे चालकांसोबत जागा मालकांवरही कारवाई करण्याचे निर्देश अपर पोलीस अधिक्षक संदिप डोईफोडे यांनी दिले आहेत. सैलानी बाबांच्या यात्रेसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधिक्षक संदिप डोईफोडे, पोलीस उपविभागीय अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली रायपुरचे ठाणेदार प्रशांत सपकाळे यांनी सैलानी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त लावला आहे. यामध्ये ५० पोलीस अधिकाºयांसह ४०० पोलीस कर्मचारी, २०० होमगार्ड व इतर जिल्ह्यातील पोलीस कर्मचारीही यात्रा परिसरातील ८० ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. सैलानी बाबांची यात्रा शांततेत पार पडावी व यात्रेदरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून यात्रेत ड्रोन कॅमेºयासह सी. सी. कॅमेरे लावण्यात आले आहे. वाहतूकीची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेमध्ये सर्वांनी नियमांचे व शिस्तीचे पालन करावे, असे आवाहन ठाणेदार प्रशांत सपकाळे यांनी केले आहे. (वार्ताहर)
सैलानी यात्रेत रस्त्यांची आखणी
बुलडाणा: सैलानी यात्रेत रस्त्यांची आखणी करण्यात आली आहे. खºया अर्थाने १७ मार्च पासून ही यात्रा प्रारंभ होत आहे. मात्र भाविकांची गर्दी आतापासूनच सुरू झाली आहे. सैलानी बाबा यात्रेत प्रशासनाने नियोजनाची तयारी केली आहे. गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सैलानी दर्गा परिसरातील शेतात रस्ते व दुकानांसाठीच्या जागेची आखणी करण्यात आली. सर्वधर्मिय एकतेचे प्रतिक असलेली सैलानी बाबा यात्रा होळीपासून सुरु होत आहे. लाखो भाविक दरवर्षी यात्रेत हजेरी लावतात. यानिमित्त सैलानीत मोठी यात्रा भरते. यात्रेत व्यावसायीक आपले दुकाने लावतात. त्यासाठी जागेची आखणी करण्यात आली. चुना टाकून जागेचे मोजमाप करण्यात आले. सैलानी दर्गा ते जांभळीवाले दर्गा हा ८० फुटांचा रस्ता तर यात्रेतील दुकानांची रस्ते ६० फुटांची ठेवली आहेत. यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी सैलानी दर्गाजवळ पोलीस स्टेशन उभारण्यात येते.