भालेगाव बाजार येथे निश्चित वेळेत भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 12:00 PM2020-04-12T12:00:15+5:302020-04-12T13:31:10+5:30

भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांना चक्क ‘घोडी’ बनवित दंडात्मक कारवाई केली,  तर काही शेतकऱ्यांना मारहाणही करण्यात आली.

Police take action against farmers at Bhalegoan bazar | भालेगाव बाजार येथे निश्चित वेळेत भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून मारहाण

भालेगाव बाजार येथे निश्चित वेळेत भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून मारहाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: तालुक्यातील भालेगाव बाजार येथे रविवारी सकाळी ९ वाजता भाजी विकणाऱ्या शेतकऱ्यांवर पिंपळगाव राजा पोलिसांची वक्रदृष्टी पडली. भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांना चक्क ‘घोडी’ बनवित दंडात्मक कारवाई केली,  तर काही शेतकऱ्यांना मारहाणही करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या वेळेत शेतकरी भाजी विक्री करीत असतानाही पोलिसांनी कारवाई केल्यामुळे पोलिसांच्या या कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कोरोना या विषाणूच्या अनुषंगाने सुरू असलेल्या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकाºयांनी मुभा दिली आहे. मात्र, असे असतानाही पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भालेगाव बाजार येथे  सकाळी ९ वाजता पोलिसांकडून शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली. तर काही भाजी विक्रेत्या शेतकºयांना चक्क पोलिसांनी ‘घोडी’बनविले. पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत.

भालेगाव बाजार येथे रविवारी सकाळी घडलेल्या प्रकाराची माहिती संबंधितांकडून घेतली जाईल.

 - हेमराजसिंह राजपूत, अप्पर पोलिस अधीक्षक, खामगाव

भालेगाव बाजार येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. बाजार भरविण्याच्या उद्देशाने आलेल्या काही सुरूवातीला पोलिसांनी सोशल डिस्टसिंग पाळण्यास समजावून सांगितले. काही जणांना हटकण्यात आले. मात्र, तरीही ते ऐकत नव्हते. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी  तात्पुरती कारवाई केली.

- सचिन चव्हाण ठाणेदार,

पिंपळगाव राजा, पोलिस स्टेशन

पोलिसांकडून शेतकºयांना अपमानास्पद वागणूक देणे अंत्यत चुकीचे आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयांशी अपमानजनक वागणूक अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही. याप्रकरणी ठाणेदारांसह संबंधितांना निलंबित करावे, अशी आपली मागणी आहे.

- रविकांत तुपकर शेतकरी नेते, बुलडाणा.

Web Title: Police take action against farmers at Bhalegoan bazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.