Buldhana: पोलिसांच्या सतर्कतेने बळावला त्याच्यावरील विश्वास! सहा लाखांच्या लुटमारीनंतर घेतला जात होता संशय

By अनिल गवई | Published: March 21, 2023 04:42 PM2023-03-21T16:42:00+5:302023-03-21T16:42:41+5:30

Buldhana: पोलीसांच्या सतर्कतेने खामगाव शहरातील अडत दुकानातील सामान्य कामगारावरील विश्वास दृढ होण्यास मदत झाली आहे. गांधी चौकात गाडीच्या िडक्कीतून सहा लाख रूपये लंपास झाल्यानंतर पोलीसांसह काहीजणांकडून त्याच्यावर संशय घेतल्या जात होता

Police's vigilance strengthened his faith! Suspicion was taken after the robbery of 6 lakhs | Buldhana: पोलिसांच्या सतर्कतेने बळावला त्याच्यावरील विश्वास! सहा लाखांच्या लुटमारीनंतर घेतला जात होता संशय

Buldhana: पोलिसांच्या सतर्कतेने बळावला त्याच्यावरील विश्वास! सहा लाखांच्या लुटमारीनंतर घेतला जात होता संशय

googlenewsNext

- अनिल गवई

खामगाव - पोलीसांच्या सतर्कतेने खामगाव शहरातील अडत दुकानातील सामान्य कामगारावरील विश्वास दृढ होण्यास मदत झाली आहे. गांधी चौकात गाडीच्या िडक्कीतून सहा लाख रूपये लंपास झाल्यानंतर पोलीसांसह काहीजणांकडून त्याच्यावर संशय घेतल्या जात होता. परंतु, आता पोलीसांच्या सतर्कतेमुळे आरोपींची टोळी जेरबंद झाली.त्यामुळे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे डीक्कीतून पसै चोरी गेलेल्या सामान्य कामगाराचा जीव भांड्यात पडला आहे.

खामगाव शहरातील गांधी चौकातून १६ मार्च रोजी प्रमोद मोठे या कामगाराच्या दुचाकीच्या डिक्कीतून ६ लाखांची बॅग लंपास करण्यात आली. दरम्यान, रविवारी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाने जीजे-१, डीए-६८८२ या आलीशान कारसह अजयकुमार अशोकभाई तमचे (४२), जिग्नेश दिनेश घासी (४४), रितीक प्रवीण बारंगे (२३) सर्व रा.अहमदनगर गुजरात या टोळीला पकडले. यात सात जण पॐरार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, टोळीतील सदस्यांनी खामगाव येथील सहा लाखांच्या बँगेची चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलीसांच्या या प्रयत्नामुळे कामगारावरील विश्वासही दृढ होण्यास मदत झाली आहे.

आठ वर्षात पहिल्यांदाच घडली घटना
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडते श्याम बजरंग गायकवाड यांच्याकडे प्रमोद मोठे हा आठवर्षांपासून व्यवहार सांभाळतो. घटनेच्या दिवशी नास्ता करण्यासाठी गाडी उभी केली असता साडेसहा लाख रूपयांच्या बॅग दुचाकीच्या डीक्कीतून लंपास झाली. या घटनेमुळे प्रमोद संशयाच्या घेर्यात सापडला. पोलीसांनीही त्याची उलट तपासणी सुरू केली. त्यावेळी गायकवाड यांनी त्याच्यावर विश्वास दाखविला. परंतु काहींनी त्याच्याकडे अंगुली निदेर्श करीत त्याला कटात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला. मात्र, सत्य हे सत्य या म्हणीचा प्रत्यय देत, प्रमोद मोठे प्रत्येक कसोटीवर खरा उतरला. आता पोलीसांनी चोरट्यांचा छडा लावला आहे. त्यामुळे प्रमाेद निष्पाप ठरण्यास पोलीसांची कृतीशीलता कारणीभूत ठरल्याची चचार् आहे.

अडत दुकानातील रक्कम बँकेतून बाजारात घेऊन जात असताना गांधी चौकातून लंपास झाली होती. पोलीसांच्या सतर्कतेमुळे आरोपी पकडल्या गेल्याचे समाधान आहे.
- प्रमोद मोठे
खामगाव.

 
पोलीसांच्या प्रयत्नामुळे चोरी गेलेल्या रक्कमेचा छडा लागला. पोलीसांचे सुरूवातीपासूनच सकारात्मक सहकार्य मिळाले. चाेरट्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आता रक्कम लवकर परत मिळावी, ही अपेक्षा आहे.
- श्याम गायकवाड
अडत व्यापारी, खामगाव

Web Title: Police's vigilance strengthened his faith! Suspicion was taken after the robbery of 6 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.