रायगाव येथे पोलिओ कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:26 AM2021-01-10T04:26:50+5:302021-01-10T04:26:50+5:30
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १७ जानेवारी २०२१ रोजी राबविली जाणार आहे. त्या आनुषंगाने आरोग्य विभागामार्फत जय्यत तयारी ...
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १७ जानेवारी २०२१ रोजी राबविली जाणार आहे. त्या आनुषंगाने आरोग्य विभागामार्फत जय्यत तयारी सुरू आहे. पोस्टर्स, कार्यशाळा, गृहभेटी याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यासाठीच प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आशा वर्कर व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १९ गावांचा समावेश असून, पल्स पोलिओ लसीकरण लाभार्थी २ हजार ३५० आहेत. पल्स पोलिओ लसीकरण करण्यासाठी ३० केंद्र राहणार असून, त्या केंद्रावर ९० कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. यासाठी आरोग्य विभागासोबतच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सुद्धा या मोहिमेत सहभाग राहणार आहे. १७ जानेवारीच्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमधून जे लाभार्थी वंचित राहतील त्यांच्यासाठी तीन दिवस आशा वर्कर यांच्याकडून घरोघर जाऊन पोलिओ डोस पाजले जाणार आहेत. एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेस आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्करची उपस्थिती होती.