राजकीय वातावरण तापले; ‘जबाब’दारीवरून कार्यकर्ते आपसात भिडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 02:08 PM2019-03-16T14:08:24+5:302019-03-16T14:08:38+5:30

‘जबाब’दारी मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू असतानाच, गेल्या आठवड्यात दोन पदाधिकारी चक्क नेत्यांसमोरच आपसात भिडल्याचा प्रकार खामगावात घडला.

Political atmosphere overheated; clashes in workers over 'Responsibility'! | राजकीय वातावरण तापले; ‘जबाब’दारीवरून कार्यकर्ते आपसात भिडले!

राजकीय वातावरण तापले; ‘जबाब’दारीवरून कार्यकर्ते आपसात भिडले!

Next

खामगाव: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुलडाणा लोकसभा मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. क्षेत्रफळाने मोठा मतदारसंघ असल्याने, जाहीर झालेल्या उमेदवारांसोबतच संभाव्य उमेदवारांनीही मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक रिंगणात उतरणारा प्रत्येकच उमेदवार मतदार संघाची ‘जबाब’दारी विश्वासूंवर सोपवित आहे. त्यामुळे ‘जबाब’दारी मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू असतानाच, गेल्या आठवड्यात दोन पदाधिकारी चक्क नेत्यांसमोरच आपसात भिडल्याचा प्रकार खामगावात घडला. निवडणुकीपूर्वीच पदाधिकाऱ्यांमध्ये रंगलेल्या ‘सामन्या’ची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

सद्यस्थितीत काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे अद्याप प्रलंबित असले तरी, संभाव्य उमेदवार म्हणून आपलेच नाव जाहीर होणार असल्याची हमखास खात्री असल्याने, निवडणूक रिंगणातील नेत्यांनी मतदार संघात जनसंपर्क वाढविला आहे. बुलडाणा मतदार संघातील एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली असून, दोन संभाव्य उमेदवार जवळपास निश्चित झालेत. तर आणखी एका मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झाल्याचे समजते. परिणामी, लोकसभा निवडणुकीत बुलडाणा लोकसभा मतदार संघात तिरंगी अथवा चौरंगी लढतीचे संकेत सद्यस्थितीत मिळताहेत. 

बुलडाणा लोकसभा मतदार संघात प्रमुख तीन राजकीय पक्षांनी जातीय समिकरणाच्या आधारे उमेदवारांची निश्चिती केली. यामध्ये एका राजकीय पक्षाने जानेवारीमध्येच आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर बुलडाणा लोकसभा मतदार संघात एक सक्षम पर्याय म्हणून समोर येत असलेल्या राजकीय पक्षाने जातीय समिकरणांच्या आधारे उमेदवार पुढे केला. इतकेच नव्हेतर बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेत, शक्तीप्रदर्शन घडविले. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी राजकारणाचा सारीपाट तापविल्याचे पाहून मतदार संघाचे नेतृत्व करणारे नेतेही कामाला लागले. लढतील प्रमुख असलेल्या या उमेदवारांच्या  हालचालींमुळे मतदार संघात जोरदार राजकीय वारे वाहू लागलेत. कार्यकर्ते आणि पदाधिकारीही प्रचारात गुंतले असतानाच, एका राजकीय नेत्यांसमोर ‘जबाब’दारीवरून दोन मोठ्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद रंगला. 

हमरी-तुमरीपर्यंत प्रकरण पोहोचल्याने लागलीच दुसºया बड्या पदाधिकाºयांना मध्यस्थी करावी लागली. वेळीच मध्यस्थीसाठी पुढे आलेल्या या पदाधिकाºयाला एका बाजूच्या रोषाला सामोरे जावे लागले. मध्यस्थी करणाºया नेत्यालाही संबंधितांनी चांगलेच सुनावले. मात्र, पक्षाची आणखी नाचक्की होवू नये, नेत्यांसमोर वाद वाढू नये म्हणून मध्यस्थी करणाºया ‘पुढाºया’ने प्रकरण सामजंस्याने मिटविण्याचे ठरविले.  त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असलेल्या पदाधिकाºयांमधील वादावर पडदा पडल्याची चर्चा आहे.

नेत्यांकडून जबाबदारीचे विकेद्रींकरण!

दोन पदाधिकाºयांमध्ये वादाचा सामना रंगण्यापूर्वी लोकसभा मतदार संघातील एका विशिष्ट परिसराची जबाबदारी एका पदाधिकाºयाकडे निश्चित करण्यात आली होती. मात्र, नेत्यांसमोरच दोन पदाधिकाºयांमधील धूसफूस बाहेर आल्याने, एका पदाधिकाºयाला आधी देण्यात आलेली ‘जबाब’दारी दोन्ही पदाधिकाºयांना विभागून देण्यात आली. 

‘ते’ तर दुसऱ्या राजकीय पक्षाचे हस्तक!

दोन बड्या पदाधिकाºयांमध्ये  वादाची ठिणगी पडली. त्यावेळी दोन्ही पदाधिकाºयांनी एकमेकांवर बेछूट आरोप केले. एकमेकांना शिविगाळ केली. यामध्ये एक पदाधिकारी जबाबदारी निश्चित करण्यात आलेला पदाधिकारी आपल्या पक्षाशी निष्ठावान नसल्याचे जोर जोरात ओरडत होता. संबंधितांनी केलेल्या पक्ष विरोधी कारवायांचे भक्कम पुरावे आपल्याकडे आहेत. संबंधीत पदाधिकारी दुसºया राजकीय पक्षाचा हस्तक असल्याचा आरोपही एका पदाधिकाºयाने केला. त्यामुळे दोघांमध्ये चक्क नेत्यांसमोरच बाचाबाचीही झाली. 

Web Title: Political atmosphere overheated; clashes in workers over 'Responsibility'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.