बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी ३२ केंद्रांवर ग्राम पंचायतीसाठी मतदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:02 AM2018-02-27T01:02:16+5:302018-02-27T01:02:16+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात २७ फेब्रुवारी रोजी ३२ मतदान केंद्रांवर ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाची मतमोजणी २८ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील ग्रामपंचायतसाठी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३0 ते ५.३0 वाजता मतदान, तर मतमोजणी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. बुलडाणा तालुक्याची मतमोजणी तहसील कार्यालय बुलडाणा येथे करण्यात येणार असून, चिखली तालुक्याची तहसील कार्यालयातील सभागृहात होणार आहे. दे.राजा, लोणार, मेहकर, शेगाव या तालुक्यांची मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयात होत आहे. खामगाव येथील मतमोजणी राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह, तहसील कार्यालय येथे होईल, तसेच मलकापूर येथील मतमोजणी तहसील कार्यालय येथे करण्यात येणार आहे. मोताळा तालुक्याची तहसील कार्यालयाच्या जुन्या सभागृहात, नांदुरा येथील तहसील कार्यालयात, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याची संबंधित तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.