बुलडाणा जिल्ह्यात १९९५ मतदान केंद्र
By Admin | Published: October 5, 2014 12:49 AM2014-10-05T00:49:42+5:302014-10-05T01:00:10+5:30
निवडणुकीसाठी ३४ खाजगी वाहने; १८0 बसेस भाडोत्री.
बुलडाणा : १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी तसेच मतदान साहित्य पोहोचविण्यासाठी निवडणूक विभागाने राज्य परिवहन महामंडळाच्या १८0 एसटी बसेस भाड्याने घेतल्या आहेत. याशिवाय ३४ खाजगी वाहने लागणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ असून १0१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १५ ऑक्टोबररोजी होणार्या मतदानासाठी १९९५ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी या मतदान केंद्रावर लागणारे मनुष्यबळ आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी निवडणूक विभागाने महामंडळाच्या १८0 एस.टी. बसेस भाड्याने घेतल्या आहेत. या बसेस त्या-त्या मतदार संघातील निवडणूक कार्यालयातून निवडणूक साहित्य, मतदान यंत्र व कर्मचार्यांना घेऊन मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे मतदान केंद्रावर पोहचतील तर मतदान झाल्यानंतर कर्मचारी व मतदान यंत्रे घेऊन स्ट्राँगरुमला मतदान यंत्रे पोहचते करतील. बसेस शिवाय ३४ खाजगी जीप सुध्दा प्रशासनाने भाडोत्री घेतल्या आहेत. याकार्यासाठी निवडणूक विभागाला ४२ लाख रुपये खर्च येणार आहे.