बुलडाण्यात मतदानासाठी ईव्हीएमऐवजी मोडक्या मतपेट्या

By admin | Published: January 13, 2017 06:28 PM2017-01-13T18:28:01+5:302017-01-13T18:34:24+5:30

सर्वच निवडणुकींमध्ये ईव्हीएमचा वापर होत असताना जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतपेटीचा वापर केला जाणार आहे.

Polling booths instead of EVMs for voting in Buldhana | बुलडाण्यात मतदानासाठी ईव्हीएमऐवजी मोडक्या मतपेट्या

बुलडाण्यात मतदानासाठी ईव्हीएमऐवजी मोडक्या मतपेट्या

Next

ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 13 -  सर्वच निवडणुकींमध्ये ईव्हीएमचा वापर होत असताना जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतपेटीचा वापर केला जाणार आहे. मतदान प्रकियेत वापरण्यात येणा-या या मतपेट्या जुन्या असून ब-याच मतपेट्यांचे लॉक व झाकण तुटलेली असल्याची बाब पुढे आली आहे.
 
पुढील महिन्यात 3 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी मतदान केले जाणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मतदानासाठी स्थानिक तहसिल कार्यालयात पाच वर्षापासून अडगळीत पडलेल्या १५६ जुन्या मतपेट्या काढण्यात आल्या आहेत.
 
मतपेट्यांचा आता निवडणुकीत जास्त वापर होत नसल्यामुळे त्या पाच वर्षापासून अडगळीत पडून होत्या. दोन दिवसापूर्वी सर्व मतपेट्या बाहेर काढण्यात आल्या. यात ब-याच मतपेट्यावर पूर्णत: गंज चढला असून, काहीची झाकणंसुद्धा तुटली आहे. काही पेट्याचे सुरक्षा लॉक गायब आहेत.
 
४६ मतदान केंद्रावर मतपेट्या
या निवडणुकीत पसंती क्रमांनुसार मतपत्रिकेवर मतदान करावे लागते. मतपत्रिकेवर फक्त आकडे लिहिणे अपेक्षित आहे. त्यामुळे मतपेट्याचा वापर केला जातो. जिल्ह्यात एकूण ४६ केंद्रातून पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ३ पेट्या असणार आहे.
 
'त्यानंतरच मतपेट्या वापरण्यात येतील'
मतदानापूर्वी सर्व मतपेट्यांची दुरुस्ती करण्यात येईल. शिवाय पेट्यांची सुरक्षेबाबत चाचणी केल्यानंतरच त्या मतदान केंद्रावर ठेवण्यात येईल. याबाबत प्रक्रिया चालू झाली आहे. -दीपक बाजड, तहसिलदार, बुलडाणा
 

Web Title: Polling booths instead of EVMs for voting in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.