खामगाव व परिसरात उपहारगृहांमध्ये दूषित पाणी, आरोग्य धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 02:55 PM2019-01-19T14:55:14+5:302019-01-19T14:55:34+5:30

 खामगाव : शहरासह तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रासपणे अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे.

polluted water serve in hotels at khamgaon | खामगाव व परिसरात उपहारगृहांमध्ये दूषित पाणी, आरोग्य धोक्यात !

खामगाव व परिसरात उपहारगृहांमध्ये दूषित पाणी, आरोग्य धोक्यात !

Next

 खामगाव : शहरासह तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रासपणे अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. जलजन्य आजाराची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जलशुध्दी उपकरण लावणे आवश्यक असताना अनेक उपहारगृहामध्ये ते बंदावस्थेत असल्याचे चित्र आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून तपासणी करणे गरजेचे आहे. 

शहरातील विहिरीतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले असतानाही पाण्याचा व्यावसायिक वापर करतात. हेच पाणी हॉटेल व्यावसायिकही वापरतात. शहरात एखाद्या ठिकाणी पाण्याची बोंब असेल त्यावेळी विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. हॉटेलमधील चवीचे खाद्यपदार्थ, चहा आदी बनविण्याकरिता याच पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्याचा वापर केला जातो. शिवाय नागरिकांना हेच पाणी पिण्यास दिले जाते. अनेकदा या पाण्यात जंतु, चामढोके आढळून येतात. या हॉटेलमध्ये बनणारे पदार्थ हे चमचमित आणि तेलकट असतात. यामुळे ते खाल्ल्यावर प्रत्येकालाच भरपूर पाणी प्यावे लागते.  त्यामुळे अशा नागरिकांचे आरोग्य अधिकच धोक्यात येत आहे. काही उपाहारगृहात विहिरीच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु सदर विहिरीचे पाणी निजंर्तुकीकरणाअभावी अशुध्द असते. पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगूनही ते पाणी पिण्यास वापरले जाते. 


तालुक्यातील उपहारगृहांची परिस्थिती गंभीर!

तालुक्यातील उपाहारगृहात हीच परिस्थिती आहे. उच्च प्रतिच्या हॉटेलमध्ये शुध्द पाण्याची बाटली विकली जाते.  शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही हॉटेलमध्ये शुद्ध पाणी असतेच असे नाही. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी विकत घेऊन पाणी प्यावे यासाठी म्हणून असे पाणी वापरले जात असल्याचेही वास्तव आहे. 

 पाणी तपासणी मोहिमेला खो!

जुन्या गोल टाक्यांमध्ये, रांजणात पाणी साठवले जाते. यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे आरोग्याला धोका असतो. यातूनच जलजन्य, साथीच्या आजाराला सुरुवात होऊन काही जीव गमावण्याची वेळ आली आहे. यासाठी ग्रामपंचायती, नगरपरिषद प्रशासनांनी पिण्याचे पाणी तपासणी मोहीम सुरूकरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी) 

Web Title: polluted water serve in hotels at khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.