शेतरस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:13 AM2021-09-02T05:13:24+5:302021-09-02T05:13:24+5:30
तळणी ते मलकापूर बससेवा सुरू करा बुलडाणा : तळणी ते मलकापूर बससेवा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गत ...
तळणी ते मलकापूर बससेवा सुरू करा
बुलडाणा : तळणी ते मलकापूर बससेवा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गत काही दिवसांपासून काेराेनाचे रुग्ण कमी हाेत असल्याने अनलाॅक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार लांब पल्ल्याच्या बस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तळणी येथेही बस सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
२९२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना केले कामावरून कमी
बुलडाणा : कोरोनाकाळात रुग्णांना साथ देणारे कोविड कंत्राटी कर्मचारी टप्प्याटप्प्याने कार्यमुक्त करण्यात येत आहे. महिनाभरापूर्वीच काही कर्मचारी काढल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजीही जिल्ह्यात कार्यरत कोविड कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले. आतापर्यंत २९२ कर्मचारी कार्यमुक्त केले. त्यामुळे बेरोजगार होत असलेल्या या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्याधिकारी यांना निवेदन पाठवले आहे़
ऑनलाईन पीक पाहणी लाभदायकच
बुलडाणा : शेती व शेतकऱ्याकरिता सातबारा उतारा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या उताऱ्यावरील पेरेपत्रक नोंद विशेष महत्त्वाची व गरजेची आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन भरलेला पीक पेरा हा थेट शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर दिसणार आहे, असे प्रतिपादन तहसीलदार रुपेश खंडारे यांनी केले.
मढमार्गे धाड मुक्कामी बस सुरू करा
बुलडाणा : काेराेना महामारीमुळे गत वर्षापासून ग्रामीण भागातील बस फेऱ्या बंद करण्यात आल्या हाेत्या. बुलडाणा, मढ मार्गे धाड ही मुक्कामी बसही बंद आहे. ही बसफेरी सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दुसरबीड परिसरातील रस्त्याची दुरवस्था
दुसरबीड : परिसरातील रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे़ समृद्धी महामार्गाच्या कामावरील जड वाहनांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़