पेनटाकळी ते कासारखेड रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:19+5:302021-06-16T04:46:19+5:30
कळंबेश्वर, थार, सारशिव, खुदनापूर या ग्रामस्थांना चिखली मेहकर जाण्यासाठी पेनटाकळी ते कासारखे रस्त्याने जावे लागते़ या रस्त्याची गत काही ...
कळंबेश्वर, थार, सारशिव, खुदनापूर या ग्रामस्थांना चिखली मेहकर जाण्यासाठी पेनटाकळी ते कासारखे रस्त्याने जावे लागते़ या रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे़ त्यामुळे वाहनधारकांसह या मार्गावर शेती असलेले शेतकरी त्रस्त झाले आहेत़ गावातील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजी पाल्याचे उत्पादन काढत आहे़ या रस्त्यावर तीन चाकी वाहन छोटे वाहन माल वाहतूक करू शकत नाही.त्यासाठी कासारखेड ग्रामपंचायतच्या वतीने तसेच गावातील नागरिकांनी अनेक वर्ष पासून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे़ मात्र, अजूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही़ गजरखेड फाट्यापासून पेनटाकळीपर्यंत रस्त्याचे काम अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे पेनटाकळीपर्यंत अर्धवट खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत़ या मार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत़ सध्या पावसाळा सुरू झाल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचते़ त्यामुळे वाहनधारकांना त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत़ याकडे सार्वनजिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे़