निकृष्ट बांधकामामुळे पूल खचला!

By admin | Published: June 17, 2017 12:16 AM2017-06-17T00:16:25+5:302017-06-17T00:16:25+5:30

धामणगाव बढे: अवघे एक महिन्यापूर्वी दोन लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पुलाचे निकृष्ट बांधकामाचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पडले.

Poor construction due to poor construction! | निकृष्ट बांधकामामुळे पूल खचला!

निकृष्ट बांधकामामुळे पूल खचला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे: अवघे एक महिन्यापूर्वी दोन लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पुलाचे निकृष्ट बांधकामाचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पडले.
मुसळधार पावसात पुलामध्ये खिंडार पडले असून, दोन्ही बाजूंनी पूल वाहून गेला. जि.प.फंडातून गावातील नदीवर पुलाचे बांधकाम पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आले. कुरेशी कब्रस्थानमध्ये जाण्यासाठी हा पूल नदीवर बांधण्यात आला होता.  संबंधित कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत ग्रामपंचायत सदस्य गजानन घोंगडे यांनी १८ एप्रिल २०१७ रोजी गटविकास अधिकारी मोताळा व कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली होती. पहिल्याच पावसात पुलास भगदाड पडले. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्य गजानन घोंगडेसह नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Poor construction due to poor construction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.