पॉस मशीन वापराने दोन टक्क्यांचा फटका!

By Admin | Published: January 24, 2017 02:25 AM2017-01-24T02:25:09+5:302017-01-24T02:25:09+5:30

ग्राहकांची नाराजी ; कॅशलेस व्यवहारांकडे व्यापा-यांची पाठ!

POS machine used to hit two percent! | पॉस मशीन वापराने दोन टक्क्यांचा फटका!

पॉस मशीन वापराने दोन टक्क्यांचा फटका!

googlenewsNext

लोणार, दि. २३- कॅशलेस व्यवहाराला पैशाच्या कपातीमुळे ग्राहकांची नाराजगी ओळखून व्यापार्‍यांकडून खोडा घातला जात आहे. डेबिट कार्डवरून खरेदीचे बिल जमा केल्यास व्यापार्‍यांना व ग्राहकांना २ टक्क्यापयर्ंत फटका बसत असल्याने अनेकांनी पॉस मशीन गल्ल्यात ठेवले आहे. नोटाबंदीच्या निर्णयासोबत ग्राहकांनी कॅशलेस व्यवहार करावेत, असे आवाहन केल्या गेले. ग्राहकांनी आणि व्यापार्‍यांनी त्यास सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस माध्यमातून मोठी उलाढाल झाली. शहरात ठिकठिकाणी व्यापार्‍यांनी मशीनद्वारे व्यवहार सुरु केले; मात्र आता बहुतेक व्यापार्‍यांनी पैसे कापले जात असल्याने मशीनच गल्ल्यात टाकून दिल्या आहेत. ग्राहकाने खरेदी केल्यानंतर बिलाचे पैसे पॉस मशीनच्या माध्यमातून दिल्यास संबंधित दुकानदाराला व्यवहारातील रकमेच्या दोन टक्क्यापयर्ंत फटका बसत आहे. खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल पॉस मशीनद्वारे दिल्यास जास्तीची दोन टक्के रक्कम बिलावर दयावी लागत असल्याने ग्राहकांची नाराजगी वाढत आहे. दोन्ही बाजूंनी व्यापार्‍यांची अडचण कॅशलेस व्यवहार वाढविण्यावर प्रशासनाचा भर असला तरी स्थानिक पातळीवर तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. ४नोटाबंदीनंतर व्यापार्‍यांनी सर्रास स्वीप मशीनचा वापर सुरु केला होता; मात्र व्यवहार होताच दोन टक्के रक्कम खात्यावरून कपात होत असल्याने आर्थिक फटका बसत आह. त्यामुळे स्वीप मशीनचा वापर कमी होत आहे .

Web Title: POS machine used to hit two percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.