अरे व्वा, शाब्बास! खामगाव आगाराला मिळाल्या पहिल्या महिला चालक!

By अनिल गवई | Published: September 4, 2023 03:03 PM2023-09-04T15:03:32+5:302023-09-04T15:06:34+5:30

स्नेहा शिवाजी खुळे यांनी खामगाव ते शेगाव पर्यंत मारली पहिली फेरी

Positive News as Khamgaon Agar of state transport got the first female driver Sneha Shivaji Khule | अरे व्वा, शाब्बास! खामगाव आगाराला मिळाल्या पहिल्या महिला चालक!

अरे व्वा, शाब्बास! खामगाव आगाराला मिळाल्या पहिल्या महिला चालक!

googlenewsNext

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रिद असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती देण्यास सुरूवात केली आहे. चालकपदासोबतच यांत्रिकक्षेत्रातही महिलांना संधी देण्यात आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच काही आगारात महिला चालक रूजू झाल्या आहेत. यामध्ये खामगाव आगारातही पहिल्यादांच महिला चालक रूजू झाल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात सात आगार असून पहिल्या टप्प्यात मेहकर, मलकापूर आणि खामगाव आगरात तीन चालक रुजू झाल्या आहेत. मेहकर आगारात संगीता लादे यांनी खामगाव ते मेहकर बसफेरी चालवून आपल्या सेवेचा शुभारंभ केला. त्याचवेळी खामगाव आगारात रूजू झालेल्या सौ. स्नेहा शिवाजी खुळे यांनी खामगाव ते शेगावपर्यंत बस चालवून पहिल्याच फेरीचा शुभारंभ केला. यावेळी आगार व्यवस्थापक संदीप पवार, वाहतूक निरिक्षक मोहिनी पाटील, सहा. वाहतूक निरिक्षक सरला तिजारे, गजानन खेडकर, शिवाजी आनंदे, माणिक गोरे, सपकाळ आदी उपस्थित होते.  बुलढाणा जिल्ह्यातील विविध आगारात रूजू झालेल्या महिला चालकांना महामंडळाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Web Title: Positive News as Khamgaon Agar of state transport got the first female driver Sneha Shivaji Khule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.