सकारात्मक विचारांनी सर्व समस्या कायमच्या मिटतात ! -  श्री श्री रविशंकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 04:38 PM2019-02-09T16:38:58+5:302019-02-09T16:40:53+5:30

 संकट कितीही मोठे असले तरी, हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काहीही एक कारण नाही, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रवीशंकर यांनी स्पष्ट केले.

Positive thoughts eradicate all problems forever! - Sri Sri Ravi Shankar | सकारात्मक विचारांनी सर्व समस्या कायमच्या मिटतात ! -  श्री श्री रविशंकर  

सकारात्मक विचारांनी सर्व समस्या कायमच्या मिटतात ! -  श्री श्री रविशंकर  

googlenewsNext

खामगाव: इर्षा, द्वेषभाव आणि वाढत्या अपेक्षांमुळे आपलुकी लोप पावली आहे. समाजातील वाढती स्पर्धा ही देखील तणावाचे एक निश्चित कारण मानल जाते.  मात्र,  संकट कितीही मोठे असले तरी, हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काहीही एक कारण नाही, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रवीशंकर यांनी स्पष्ट केले.

संकटांना घाबरून कुणाचेही भलं नाही. देशातील मोठंमोठे उद्योगपती कर्जबाजारी आहेत. तिथे सामान्य आणि शेतकºयांच्या अवस्थेची कल्पनाच न केलेली बरी! तथापि, निराशेचे कारण कोणतेही असले तरी, कुणीही आपला लाख मोलाचा जीव गमवू नये, असा उपदेशही त्यांनी दिला. देशातीलच नव्हे तर विदेशातही तणावमुक्तीसाठी आर्ट आॅफ लिव्हींग परिवाराची धडपड सुरू असल्याचे ते म्हणाले.  ‘गुरूपावली’सोहळ्यासाठी ते खामगाव येथे आले असता, ‘लोकमत’शी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. 


 समाजातील आत्महत्या वाढीस लागण्याचे कारण काय?

- वाढत्या स्पर्धेमुळे युवकाच्या तर नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढीस लागल्याचे दिसून येते. घरगुती कलहामुळे अनेकांच्या जीवनात तणाव वाढीस लागतात. त्यामुळे ‘टोका’चे पाऊल उचलणारांची संख्या वाढीस लागल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मात्र, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे; विचारी मना तूच शोधुनी पाहे’ या उक्तीने प्रत्येकाने संकटाला आणि तणावाला सामोरे जावे. 

 ‘आर्ट आॅफ लिव्हींग’च्या प्रयत्नांमुळे समाजात सकारात्मक परिणाम जाणवतात का? 

- निश्चितच, समाजातील प्रत्येकाच्या तणावमुक्तीसाठी  ‘आर्ट आॅफ लिव्हींग’च्या माध्यमातून सन १९८१ पासून सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ४१ कोटींहून अधिक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आलेत. प्रत्येक व्यक्ती आणि समाजातील शेवटचा घटक तणावमुक्त व्हावा, नैराश्य आणि हिंसकवृत्तीतून बाहेर यावा, यासाठी ‘आर्ट आॅफ लिव्हींग’परिवार प्रयत्नशील आहे. 


 आर्ट आॅफ लिव्हींग परिवाराच्या सामाजिक योगदानाबद्दल काय सांगाल!

- संगीत, ध्यान आणि साधनेद्वारे तणावमुक्त समाजाची निर्मिती हे आर्ट आॅफ लिव्हींग परिवाराचे प्रमुख लक्ष्य आहे. मात्र, संस्कारशील समाज आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी सर्व सामाजिक स्तरांमध्ये तंटामुक्ती, नैसर्गिक आपत्ती निवारण, सर्व शिक्षा अभियान, निसर्ग संवर्धन आणि स्त्री सबलीकरणातही या परिवाराचे मोठं योगदान आहे. पाणलोट, जलसिंचनासोबतच सेंद्रीय शेतीवर ‘आर्ट आॅफ लिव्हींग’ परिवाराने लक्ष्य केंद्रीत केले आहे.


 वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनासंदर्भात काय सांगाल!

- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासह देशात विविध ठिकाणी पाणलोट क्षेत्रावर भर दिल्या जात आहे. ‘प्रकल्प भारत’अभियानांतर्गत सेंद्रीय शेती आणि युवकांना उद्योजकतेचे धडेही दिल्या जात आहे. ‘कौशल्य’विकास कार्यक्रमांवरही या परिवाराचा भर राहील. आगामी काळात जापान येथे होणाºया आॅलम्पिक स्पर्धांसाठी आर्ट आॅफ लिव्हींग संस्था पाच हजार युवकांना कौशल्य विकासाचे धडे देणार आहे. 

 युवापिढीसाठी आपला संदेश काय?

- संयम, तृप्ती आणि कृतार्थता या त्रिसुत्रीचा अंगीकार केल्यास, जीवनात परिपूर्णता येते. युवकांनी स्वत:सोबतच आदर्श भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, जीवनात नैराश्य आल्यास ‘आर्ट आॅफ लिव्हींग’ परिवाराशी संलग्न व्हावे. सर्वप्रकारच्या व्यसनांचा त्याग करावा. समर्पण भावनेने आई-वडील, गुरूजन, समाज आणि पर्यायाने देशाची सेवा करावी!

Web Title: Positive thoughts eradicate all problems forever! - Sri Sri Ravi Shankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.