नगरपंचायतींचे मतदार वाढण्याची शक्यता
By admin | Published: September 24, 2015 01:26 AM2015-09-24T01:26:41+5:302015-09-24T01:26:41+5:30
विधान परिषद निवडणुकीची पृष्ठभूमीवर मोताळा-संग्रामपुरात निवडणुकीची लगबग.
बुलडाणा : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नगरापंचायतीमुळे सध्या असलेल्या मतदारसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बुलडाण्यातील मोताळा व संग्रामपूर या दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली असून, विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या निवडणुका पार पडल्या, तर मतदार वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बुलडाण्यातील मोताळा व संग्रामपूर या दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार झाल्या असून, या याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी ग्रामस्थांना मुदत देण्यात आली आहे. या दोन्ही नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मागील निवडणूक १८ डिसेंबर २00९ रोजी झाली होती. या निवडणुकीला येत्या डिसेंबरमध्ये सहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीची घोषणा दिवाळीपूर्वी होणे अपेक्षित आहे. त्यापूर्वीच नगरपंचायतींची निवडणूक झाली, तर मतदारांची संख्या वाढणार आहे.