‘वनरक्षक’ पदभरतीत पश्चिम वऱ्हाडच वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 05:34 PM2019-02-02T17:34:56+5:302019-02-02T17:35:12+5:30

बुलडाणा: महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण ९०० जागांसाठी वनरक्षक पदभरती घेण्यात येत असून या भरतीतून पश्चिम वऱ्हाडालाच वगळण्यात आल्याचे दिसून येते.

For the post of 'Forest Guard', excluding West Varahad | ‘वनरक्षक’ पदभरतीत पश्चिम वऱ्हाडच वगळला

‘वनरक्षक’ पदभरतीत पश्चिम वऱ्हाडच वगळला

Next

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण ९०० जागांसाठी वनरक्षक पदभरती घेण्यात येत असून या भरतीतून पश्चिम वऱ्हाडालाच वगळण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील उमेदवार इतर जिल्ह्यांसाठी अर्ज करत आहेत. वनरक्षक पदासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची ३ फेब्रुवारी ही अंतीम मुदत असल्याने अर्जासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी उरला आहे. वने हे नैसर्गिक स्त्रोतांचा एक अविभाज्य भाग सजमला जातो. या नैसर्गिक संपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची महत्त्वाची जबाबदारी ‘वनरक्षकाच्या’ खांद्यावर असते. त्यामुळे वन विभागात वनरक्षक (गट क) या पदाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. राज्यात वन विभागातील गट क संवर्गातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यात एकूण ९०० वनरक्षक पदे भरण्यात येत असून त्यामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रात ५९८ व अनुसूचित क्षेत्रात ३०२ जागांचा समावेश आहे. परंतू या पदभरतीमध्ये पश्चिम वºहाडातील बुलडाणा, वाशिम व अकोला या तिन्ही जिल्ह्याच्या वाट्याला एकही जागा आली नाही. संपुर्ण महाराष्ट्रात भरतीप्रक्रिया सुरू असताना पश्चिम वºहाडातील जिल्हे यामध्ये वगळण्यात आल्याने या जिल्ह्यातील उमेदवारांना इतर ठिकाणी अर्ज करावे लागत आहेत. परिणामी बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यातील उमेदवारांना परीक्षेसाठी सुद्धा बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागणार असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची सुरूवात १४ जानेवारी पासून सुरू झालेली आहे. त्याकरीता उमेदवार उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी कुठल्याही एका विषयात उत्तीर्ण असावा, अशी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जमाती किंवा माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी दहावी उत्तीर्ण व उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे, अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची अंतीम मुदत ३ फेब्रुवारी असून अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी उरल्याने विद्यार्थ्यांची सध्या आॅनलाइन संकेतस्थळावर गर्दी होत आहे.

राज्यात उपलब्ध जागा

राज्यात एकूण ९०० वनरक्षक पदाच्या जागा आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग २२, सोलापूर दोन, ठाणे १९५, यवतमाळ ६२, पालघर २९, पभरणी तीन, पुणे ३२, रत्नागिरी दोन, सांगली दोन, सांतारा १३, कोल्हापूर ७२, नागपूर २६८, नांदेड ३७, नंदुरबार ७०, नाशिक ५८, उस्मानाबाद १०, चंद्रपूर ८०, धुळे १४६, गडचिरोली १४१, गोंदिया ६८, हिंगोली दोन, जळगाव ३२, अहमदनगर ३०, अमरावती ८०, औरंगाबाद ९५, बीड तीन, भंडारा १९ जागा आहेत.

सर्कल निहाय ह्या जागा आहेत. त्यामुळे अमरावती विभागातील एकूण रिक्त पदे विचारात घेऊन ही भरती होत असून यात नविन भरती प्रक्रियेतील उमेदवारांची अकोला, बुलडाणा, वाशिम कुठेही बदली होऊ शकते.

- संजय माळी, जिल्हा उपवनसंरक्षक, बुलडाणा.

Web Title: For the post of 'Forest Guard', excluding West Varahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.