पोस्ट ऑफिसमध्ये दीड कोटींच्यावर ठेव जमा!

By admin | Published: November 18, 2016 02:41 AM2016-11-18T02:41:48+5:302016-11-18T02:41:48+5:30

१ कोटी ६६ लाख ८0 हजार रुपये झाले जमा.

Post office deposit deposits on half crores! | पोस्ट ऑफिसमध्ये दीड कोटींच्यावर ठेव जमा!

पोस्ट ऑफिसमध्ये दीड कोटींच्यावर ठेव जमा!

Next

खामगाव, दि. १७- एक हजार आणि पाचशेच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्यानंतर शहरासह राज्यातील पोस्ट ऑफिसमध्ये रक्कम ठेव म्हणून जमा करण्याचा ओघ कमालीचा वाढला आहे. दरम्यान, पतीराजांपासून लपविलेल्या लक्षावधी रुपयांचाही बचत आणि आवर्ती ठेव म्हणून जमा करण्याचा प्रयत्न महिला वर्गाकडून गेल्या जात आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांमध्ये खामगाव पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल १ कोटी ६६ लाख ८0 हजार ९0८ रुपयांची ठेव जमा झाली आहे.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ नोव्हेंबरपासून ५00 व १000 रुपयाच्या नोटा बंदचा निर्णय जाहीर केला.
या नोटा ३0 डिसेंबरपर्यंंत पोस्टात किंवा बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेच शहरातील एटीएमवर पैसे काढण्यासाठी, काहींनी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. १0 नोव्हेंबरपासून नागरिकांचा राज्यातील विविध पोस्ट ऑफिसमध्ये रक्कम ठेव म्हणून जमा करण्यासाठी ओघ सुरू झाला.
खामगाव येथील पोस्ट ऑफिसमध्ये १६ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंंंत तब्बल १ कोटी ६६ लाख ८0 हजार ९0८ रुपयांची बचत आणि आवर्ती ठेव जमा झाली आहे. ठेव जमा करणार्‍यांमध्ये महिलांचा प्रामुख्याने कल दिसून येत आहे. पतीपासून लपवलेली लक्षावधी रुपयांची रक्कम पोस्ट ऑफिसमध्ये ठेव म्हणून ठेवली जात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हजार आणि पाचशेच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्यानंतर, पोस्ट ऑफिसमध्ये रक्कम ठेव म्हणून गुंतवण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. यामध्ये महिला वर्गाची विशेष गर्दी असून, बुधवारपर्यंंंत १ कोटी ६६ लाख ८0 हजार ९0८ रुपयांची बचत आणि आवर्ती ठेव जमा झाली आहे.
- व्ही.एस. हिवराळे
पोस्ट मास्तर, पोस्ट ऑफिस खामगाव.

Web Title: Post office deposit deposits on half crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.