पाच मिनिटात उघडता येते पोस्ट पेमेंट बँकेचे खाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:39 AM2021-08-13T04:39:19+5:302021-08-13T04:39:19+5:30
गर्भवती महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेनुसार शासकीय अनुदान दिले जात आहे. यासाठी बँकेचे बचत खाते आवश्यक असल्यामुळे त्यांना अनुदानासाठी ...
गर्भवती महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेनुसार शासकीय अनुदान दिले जात आहे. यासाठी बँकेचे बचत खाते आवश्यक असल्यामुळे त्यांना अनुदानासाठी उशीर लागत होता. परंतु आता पोस्ट ऑफिसमध्ये तत्काळ गर्भवती महिलांना या ठिकाणी बचत खाते उघडता येणार आहे. त्यामुळे महिलांना अनुदान मिळविण्यासाठी वेळ लागणार नाही. या खाते उघडण्याकरिता जास्त पैशाची गरजही नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. लोणार येथील भारतीय स्टेट बँकेत व्यापारी ग्राहकांचे शेतकरी कर्ज योजना तसेच इतर शासकीय विभागातील शासकीय योजनेच्या कामाचा व्याप पाहता दिवसेंदिवस या बँकेमध्ये खात्यांची संख्या वाढत आहे. बचत खाते आधार लिंक करण्यासाठी व इतर सर्व कामासाठी महिलांना त्रास होत होता. परंतु आता हा त्रास वाचला आहे.
बॉक्स
ग्रामीण स्तरावरही सुरू करावी योजना
शहरी भागातील महिलांना अंगणवाडी केंद्रावर व ग्रामीण रुग्णालय येथे पोस्ट विभागांतर्गत शिबिर लावून या गरोदर महिलांचे खाते उघडण्यात यावे, हे महिलांसाठी सोईचे ठरेल अशी बरीच गरोदर मातांची मागणी आहे.