डाक विभागाची सेवा झाली हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:34 AM2021-01-20T04:34:10+5:302021-01-20T04:34:10+5:30

डाक विभागातर्फे इंडियाज पोस्ट पेमेंट बँक या खात्यांमध्ये रोजगार हमी योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, ...

The postal service was hi-tech | डाक विभागाची सेवा झाली हायटेक

डाक विभागाची सेवा झाली हायटेक

Next

डाक विभागातर्फे इंडियाज पोस्ट पेमेंट बँक या खात्यांमध्ये रोजगार हमी योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, किसान सन्मान योजना, खावटी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, शासनाच्या सर्व प्रकारच्या सबसिडी योजनांचे लाभ व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांकरिता चालू खाते खोलण्याची सुविधा देण्यात आली आहे. खाते हे ‘झिरो बॅलन्स’वर चालू ठेवता येते. याशिवाय एईपीएस माध्यमातून आपण इतर कोणत्याही बँक खात्यातील पैसे आपल्या नजीकच्या डाक कार्यालयातून काढू शकतो. आवश्यकता असल्यास आपण पोस्टमनद्वारे घरीसुध्दा एईपीएस माध्यमातून पैसे काढू शकतात. राज्य व केंद्र सरकारच्या पेन्शनरकरिता घरबसल्‍या जीवन प्रमाण योजनेचे प्रमाणपत्र काढू शकतात. या योजनेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डाक विभागाचे अधीक्षक ए. के. इंगळे यांनी केले आहे. आयपीपीबी मोबाइल ॲप डाक पे ॲप, व्हर्चुअल एटीएम, ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा विनामूल्य आहे. या ॲपमधून कोणत्‍याही पोस्ट ऑफिसचे आरडी, पीपीएफ, सुकन्या खात्यात विनामूल्य घरूनच भरणा करू शकतात. त्यामधून वीजबिल, विमा हप्ता, मोबाइल रिजार्च, गॅस सिलिंडर बिलाचा भरणा करू शकतात. खाते काढण्याकरिता फक्त आधार क्रमांकाची आवश्यकता आहे. इतर कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. हे खाते पोस्टमनद्वारे घरी काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांनी खाते काढून विविध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: The postal service was hi-tech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.