कोविडबाधित रूग्णांच्या गृह अलगीकरणाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 03:33 PM2021-05-25T15:33:13+5:302021-05-25T15:33:52+5:30

Corona Cases : ग्रामीण आणि शहरी रूग्णांची संस्थात्मक अलगीकरणात होणार रवानगी

Postponement of home segregation of covid patients | कोविडबाधित रूग्णांच्या गृह अलगीकरणाला स्थगिती

कोविडबाधित रूग्णांच्या गृह अलगीकरणाला स्थगिती

googlenewsNext

-अनिल गवई
खामगाव: ग्रामीण आणि शहरी भागातील गृह अलगीकरणातील रूग्णांच्या मुक्तसंचाराचा मुद्दा संपूर्ण जिल्ह्यात ऐरणीवर आला. परिणामी, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागत असल्याचे निर्दशनास येताच जिल्ह्यातील गृह अलगीकरणाच्या पर्यायाला स्थगिती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिलेत. त्यामुळे आगामी काळात कोविड बाधित रूग्णांची संस्थात्मक अलगीकरणातच रवानगी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोना विषाणू संक्रमनाच्या दुसºया लाटेचा १५ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात उद्रेक आहे. कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोविड केअर सेंटर, कोविड रूग्णालये अपुरे पडल्यानंतर गृह अलगीकरणाचा पर्याय निवडण्यात आला. मात्र, ग्रामीण आणि शहरी भागातील  गृह अलगीकरणातील कोविड बाधित रूग्णांच्या मुक्तसंचाराचे प्रकार ऐरणीवर आल्यानंतर सुरूवातीला ग्रामीण भागातील गृह अलगीकरणाला (ग्रामीण आयसोलेशनचा) पर्याय देण्यात आला. त्यानंतर आता शहरी भागातील अलगीकरण तात्काळ बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी दिलेत.  तात्काळ अंमलबजावणीच्या सूचनाही संबंधित प्रशासकीय अधिकाºयांना दिले आहेत.


खामगावात नवीन कोविड केअरची चाचपणी!


-  लक्षणे न जाणवणाºया कोरोना बाधित रूग्णांना संस्थात्मक अलगीकरणाच्या निर्देशानंतर खामगाव येथे दुसरे कोविड केअर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य यंत्रणेकडून पंचशील होमिओ पॅथी रूग्णालयात कोविड केअर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्यात.

खामगावात ९६४ रुग्ण विलगीकरणात!
- खामगाव शहरात सातत्याने कोरोना संक्रमित रूग्णांची भर पडत आहे. दररोज सरासरी ७०-८० रूग्ण कोरोनाबाधित येत आहे. आतापर्यंत ९६४ रूग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोविड रूग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये जागा न मिळणाºया रूग्णांना गृहअलगीकरणाचा पर्याय दिला जात होता.  मात्र, कोरोना बाधित रूग्णाचा मुक्त संचार आणि घरावरील अलगीकरणाचे फलक गायब करण्याचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर आता गृह अलगीकरण बंद करण्यात आले आहे.


अशी आहे बाधितांची आकडेवारी
पॉझिटिव्ह रूग्ण ८३२४१
बरे झालेल रूग्ण ७८१०९
एकुण मृत्यू ००५७३
बाधित रूग्णसंख्या ०४५५९
 

Web Title: Postponement of home segregation of covid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.