पोल्ट्री उद्योग संकटात; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोडल्या कोंबड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 03:55 PM2020-03-13T15:55:44+5:302020-03-13T15:55:49+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कोंबड्या सोडून आंदोलन करण्यात आले.
बुलडाणा : सध्या कोरोना विषाणूची दशहत सर्वत्र निर्माण झाली आहे. त्यामुहे पोल्ट्री उद्योग संकटात सापडले आहेत. शासनाने पोल्ट्रीधारकांना अनुदान स्वरूपात मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कोंबड्या सोडून आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. पोल्ट्रीधारकांना अनुदान द्या, यासह विविध प्रकारच्या घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. ह्यकोरोनाह्णची प्रचंड धास्ती वाढली आहे. चिकनचा आणि कोरोनाचा कोणताही संबंध नसतानाही केवळ अफवेमुळे पोल्ट्री उद्योग धोक्यात आला आहे. कुक्कुटपालन व्यवसाय करणारे सर्व शेतकरी आहेत. शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी पोल्ट्री उद्योग शेतात सुरू केला आहे. पोल्ट्री व्यवसायावर आलेली ही आपत्ती पाहता शासनाने पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारींमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कोंबड्या सोडू, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रवेशद्वारासमोरच कोंबड्या सोडून हे आंदोलन करण्यात आले.